esakal | कोरोनामुळे गणपती विसर्जन करा घरच्या घरी
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati-Visarjan

कोरोनामुळे गणपती विसर्जन करा घरच्या घरी

sakal_logo
By
रमेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गर्दी टाळण्यासाठी महापालिकेकडून खबरदारीचा उपाय म्हणून जुनी सांगवी व परिसरातील विसर्जन घाट बंद करण्यात आले आहेत.घाटावर प्रशासनाकडून सार्वजनिक विसर्जन घाट पत्रे मारून बंद करण्यात आले आहेत.

हेही वाचा: पिंपरी: अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स व किऑक्सवर होणार धडक कारवाई

तर भाविक नागरिकांच्या सोयीसाठी प्रभाग क्रं.३२ मधे फिरत्या विसर्जन रथाची व्यवस्था करण्यात आली आहे. जुनी सांगवी परिसरात फुलांनी सजवलेल्या एक टेम्पो,दोन ट्रॅकृटरची व्यवस्था करण्यात आली आहे.यात पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.गणपती विसर्जन घाट बंद राहतील याबाबत नागरिकांना सुचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: पिंपरीत रविवारी ६२ केंद्रांवर ‘कोव्हिशिल्ड’

दिड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी श्री गणेश विसर्जन रथ येथील छावा चौक प्रियदर्शनी नगर,नगरसेवक हर्षल ढोरे जनसंपर्क कार्यालय श्रीराम मंदिर, मधूबन गणपती मंदिर, बॅडमिंटन हॉल पीडब्ल्यूडी ग्राउंड सांगवी, काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल पिंपळे गुरव, निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, मनपा शाळा, अहिल्यादेवी होळकर शाळा जुनी सांगवी, बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव जुनी सांगवी, मल्हार गार्डन हॉल नवी सांगवी आणि बालाजी लॉन्स मुळा रोड जुनी सांगवी येथे मूर्ती संकलनाची सोय करण्यात आली आहे.

हेही वाचा: पिंपरी: संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या नराधमांचा स्वैराचार रोखा

"पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जुनी सांगवी परिसरातील सर्व गणपती विसर्जन घाट बंद ठेवण्यात आले आहेत. दिड दिवसांच्या गणपती विसर्जनापासून पालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जन फिरत्या रथांची व्यवस्था करण्यात आली आहे.यात स्थापत्य व आरोग्य विभाग संयुक्त योगदान करत आहेत. भाविक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा."

- नगरसेवक हर्षल ढोरे

"विविध चार ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असल्यामुळे नागरिकांना सोयीस्कर झाले आहे."

- युवराजसिंह गायकवाड सामाजिक कार्यकर्ता

"कोट-दिड दिवसांच्या गणपती पासून पुढील उत्सवापर्यंत जुनी सांगवीत फिरत्या विसर्जन रथाची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविक नागरिकांसाठी फोनवरून संपर्क केल्यास प्रत्येकाच्या दारापर्यंत रथ (गाडी) नेण्यासाठी काळजी घेतली जात आहे."

- राजेंद्र हत्ते सहाय्यक अभियंता स्थापत्य विभाग जुनी सांगवी.

loading image
go to top