गॅस सिलिंडरचा काळाबाजार; पाच जणांना अटक

स्वयंपाकाच्या गॅसची सिलिंडरमधून चोरी करून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रहाटणीतील पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली.
Gas Cylinder
Gas CylinderSakal

पिंपरी - स्वयंपाकाच्या गॅसची सिलिंडरमधून चोरी करून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रहाटणीतील पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ६२ सिलींडर व रोख रकमेसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी वाघे हा पिंपळे निलख येथील वंदना गॅस एजन्सी येथून आणि त्याचा भाऊ धनराज वाघे हा औंध येथील गुरुप्रसाद गॅस एजन्सी येथील डिलिव्हरी बॉय व कामगारांकडून भरलेले घरगुती गॅस सिलींडर विकत घेतात. पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातील स्वतःच्या आदित्य गॅस दुकानाच्या मागील पत्राशेडमधील खोलीत नेतात. त्यातून प्रत्येकी दोन-तीन किलो गॅस चोरून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरतात व काळ्या बाजारात विकतात, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. भरलेल्या सिलिंडरमधून ते रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरत होते. त्यांच्याकडून एक लाख ६० हजारांचे दोन टेम्पो, एक लाख ४१ हजार एक रुपयांचे ६२ सिलींडर, १३ हजार ४५० रुपये रोख व सात हजार ६०० रुपयांचे अन्य साहित्य असा तीन लाख २२ हजार ५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Gas Cylinder
कधी सुरू होणार शाळा

गॅस रिफिलींग करणारा धनराज मल्लप्पा वाघे (वय २८, रा. सुयोग कॉलनी, रहाटणी), शुभम रघुनाथ गवळी (वय २७, रा. पवनानगर, रहाटणी), टेंपोचालक काकासाहेब साहेबराव मिसाळ (वय ४९, रा. वेताळनगर, चिंचवड), अतीश अंबादास कसबे (वय २८, रा. रहाटणी) आणि सिलिंडरची वजने करणारा सुरेश राजकुमार म्हेत्रे (वय २५, रा. सुयोग कॉलनी, रहाटणी) यांना अटक केली आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, अंमलदार योगेश तिडके, जालिंदर गारे, सचिन गोनटे, नितीन लोंढे, संतोष बर्गे, विजय कांबळे, भगवंता मुठे, अनिल महाजन, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, अतुल लोखंडे यांच्या पथकाने कारवाई केली.

चाकणमधील टोळीचाही पर्दाफाश

चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील रासे येथील गणराज गॅस एजन्सीच्या मागे छापा टाकून पोलिसांनी स्वयंपाकाच्या गॅसची चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यात टॅंकरचालक नरसिंग दत्तू फड (वय ३१), अमोल गोविंद मंडे (वय २८, दोघे रा. आंबेजागाई, जि. बीड) आणि चोरून गॅस विकणारा राजू बबन चव्हाण (वय ५२, रा. रासे, ता. खेड) यांचा समावेश आहे. गॅस वाहतूक करणाऱ्या दोन कॅप्सूल टॅंकरमधून गॅस चोरून व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्री केला जात होता. त्यांच्याकडून दोन टॅंकर, एचपी- भारत व इंडेन गॅस कंपनीचे लोगो असलेले ३० सिलिंडर असा एक कोटी १० लाख, पाच हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com