esakal | गॅसदराचा पुन्हा भडका; सर्वसामान्यांचं गणित कोलमडलं

बोलून बातमी शोधा

गॅसदराचा पुन्हा भडका; सर्वसामान्यांचं गणित कोलमडलं }
 • सिलिंडरच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे गणित कोलमडले 
गॅसदराचा पुन्हा भडका; सर्वसामान्यांचं गणित कोलमडलं
sakal_logo
By
पीतांबर लोहार

पिंपरी : मी रोजंदारीवर फर्निचरचे काम करतो. घर भाडे भरावे लागते. मुलाचे शिक्षण आहे. मुलगी विशेष आहे. महिन्याला पंधरा-सोळा हजार हातात पडतात. त्यात सगळं भागवावं लागतं. त्यात गॅस सिलींडरसह किराणा मालाच्या किमतीही वाढत आहेत, तुम्हीच सांगा आम्ही जगायचं कसं? हा सवाल आहे, काळेवाडीतील राजू हिवाळे या कामगाराचा. हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशीच स्थिती हातावर पोट भरणाऱ्या कामगारांसह अनेक मध्यमवर्गीयांचीही आहे. "माझा मुलगा दहावीला आहे. बारा वर्षांची मुलगी विशेष आहे. तिला सोडून आई कामाला जाऊ शकत नाही. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. कुटुंबाची गरज भागविण्यासाठी जमेल तितक्या दिवस ओव्हर टाइम काम करतो," असे त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व लॉकडाउननंतरची स्थिती 
- अनेक कुटुंबांपुढे रोजगाराची समस्या 
- अनेकांची नोकरी गेली 
- व्यवसायात नुकसान झाले 
- पेट्रोल शंभर रुपये लिटर झाल्याने दुचाकी परवडत नाही 
- स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरच्या किमती दर आठवड्याला वाढताहेत 
- फेब्रुवारी महिन्यात चार वेळा सिलिंडरच्या किमती वाढल्या 

चार व्यक्तींच्या कुटुंबाचे गणित 
असे उत्पन्न (रुपयांत) 

 • दिवसाची हजेरी (आठ तास) : ५०० 
 • ओव्हर टाइम केल्यास (तीन तास) : २५० 
 • महिन्याला पगार (आठ तासासाठी) : १५,००० 
 • किमान १५ दिवस ओव्हर टाइम : ३,७५० 
 • महिन्याला एकूण सरासरी पगार : १८,७५० 

(टीप : प्रत्येक महिन्याला ओव्हर टाइम असेलच असे नाही) 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा खर्च 

 • घरभाडे : ५,५०० 
 • किराणा माल : ४,५०० 
 • वीजबिल, गॅस सिलिंडर : १,५०० 
 • पेट्रोल खर्च : २,५०० 
 • भाजीपाला, दूध : १,५०० 
 • किरकोळ (दळण, दवाखाना वगैरे) : २,००० 
 • महिन्याला एकूण सरासरी : १७,५०० ते १८,५०० 

असे वाढलेत सिलिंडरचे दर 

 • १ फेब्रुवारी : ६९८ 
 • १५ फेब्रुवारी : ७२५ 
 • २५ फेब्रुवारी : ७७४ 
 • २८ फेब्रुवारी : ७९८ 
 • १ मार्च : ८२४ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘गेल्या एप्रिलपर्यंत गॅस सिलिंडरची ६०० रुपये मूलभूत किंमत असायची. त्यावर सबसिडी दिली जायची. ती आता बंद केली आहे. शिवाय, सिलिंडरचे दर प्रत्येक आठवड्याला बदलत आहेत. हे सर्वसामान्यांना त्रासदायक आहे. आर्थिक तूट भरून काढण्यासाठी इंधनाच्या किमती भरमसाट वाढविणे चुकीचे आहे. गॅस सिलिंडर ही जीवनावश्‍यक वस्तू असल्याने सरकारने पुनर्विचार करायला हवा.’’ 
- मानव कांबळे, गॅस सिलींडर एजन्सी चालक