esakal | घोलप महाविद्यालयात 'जागतिक हात धुणे दिन' साजरा
sakal

बोलून बातमी शोधा

global-handwashing-day

प्राचार्य नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये आलेल्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे हात सॅनिटायझरने धूत तसेच योग्यप्रकारे कसे धुवावावेत याचे प्रात्यक्षिक दाखवत  'जागतिक हात धुणे दिन' साजरा करण्यात आला.

घोलप महाविद्यालयात 'जागतिक हात धुणे दिन' साजरा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जुनी सांगवी - सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हात धुणे दिवस साजरा करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्राचार्य नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये आलेल्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे हात सॅनिटायझरने धूत तसेच योग्यप्रकारे कसे धुवावावेत याचे प्रात्यक्षिक दाखवत  'जागतिक हात धुणे दिन' साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानेश्वर जांभूळकर, प्रा. अमृता इनामदार, डॉ. अर्जुन डोके आदी मान्यवर उपस्थित होते.

वृद्ध आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुलासह सुनेवर गुन्हा 

यावेळी घोरपडे म्हणाले,शारीरिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी व कोरोनाविषाणू पासून बचावासाठी हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे.सर्वांनी नियमित वेळोवेळी हात धुवायला हवे.

तर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिसरात राहत असलेल्या दहा व्यक्तींचे हात सॅनिटायझरने धुवून देण्याचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सुरू केला.या उपक्रमाद्वारे हात धुण्यात आलेल्या 230 व्यक्तींची माहिती व फोटो माहिती 'गुगल फाॅर्म' द्वारे संकलित करण्यात आली.

Edited By - Prashant Patil