बसचालकाचा रिव्हर्स,मेघा यांची धाव!वाचले चिमुकलीचे प्राण!!

चालक बस रिव्हर्स घेत असतो बसमागे पाईपवर बसलेली लहानगी काव्या (बदललेले नाव) त्याच्या दृष्टीपथास पडत नाही आणि ती थेट रिव्हर्स येणाऱ्या बसखाली जाते.
bus accident
bus accident sakal

वाकड : चालक बस रिव्हर्स घेत असतो बसमागे पाईपवर बसलेली लहानगी काव्या (बदललेले नाव) त्याच्या दृष्टीपथास पडत नाही आणि ती थेट रिव्हर्स येणाऱ्या बसखाली जाते.

तेंव्हा जवळच जॉगिंग करणाऱ्या मेघा यांनी हे पाहून समयसूचकता दाखवीत कशाचीही पर्वा न करता जिवाच्या आकांताने पळ काढला. बस चालकाला बस थांबविण्यास सांगीतले बस थांबताच सर्वांनी काव्याला बस खालून सुखरूप बाहेर काढले.

अगदी क्षणाचाही विलंब झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र, ऐनवेळी जणू देवदूत बणून आलेल्या मेघा विजय नलगे ह्या महिलेच्या प्रसंगावधानामुळे त्या चिमूरडीचे प्राण वाचले एवढेच नव्हे तर तीला साधे खरचटले देखील नाही.

यामुळे मेघा यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्येय आल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

कस्पटे वस्ती, वाकड येथील दक्षता नगर, सोसायटीच्या आवारात शुक्रवारी (ता. २२) सकाळी सातच्या सुमारास ही आश्चर्यकारक घडना घडली. याबाबत माहिती अशी, इयत्ता दुसरीत शिकणारी काव्या नेहमीप्रमाणे स्कुलबसची वाट पाहत सोसायटी गेट समोरील मोठ्या पाईपवर बसली होती यावेळी तीचे पालकही सोबत होते.

काही कामानिमित्त तीची आई क्षणभरासाठी बाजूला जाते आणि तेवढ्यातच ही थरारक घटना घडते. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.त्या मुलीला बस खालून काढण्यासाठी स्नेहल गवळी, आशा तोरडमल, प्रियांका पवार यांनी मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com