‘राजकारण करण्याऐवजी गरिबांना लवकर घरे द्या’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

पंतप्रधान आवास योजनेची सोडत ऐनवेळी रद्द झाल्याच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवार) शहरात अनेक प्रतिक्रिया उमटली. राजकारण करण्याऐवजी गरिबांना लवकरात लवकर घरे द्यावी, अशी प्रतिक्रिया विविध संघटनांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी - पंतप्रधान आवास योजनेची सोडत ऐनवेळी रद्द झाल्याच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवार) शहरात अनेक प्रतिक्रिया उमटली. राजकारण करण्याऐवजी गरिबांना लवकरात लवकर घरे द्यावी, अशी प्रतिक्रिया विविध संघटनांनी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवडलगतची सात गावे समाविष्ट करण्याचा निर्णय कधी

कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले, ‘घरकुलाच्या प्रश्‍नांवर राजकारण नको सर्वांना घरकुल द्या. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गरिबांच्या भावनांशी खेळू नये. लवकरात लवकर सोडत घेऊन नागरिकांना घर द्यावेत. कोरोनामुळे जगायचे कसे आणि भाडे कुठून भरायचे असा प्रश्‍न निर्माण झाला होता. लोक कशीबशी उपजीविका चालवत असून, आता मात्र नागरिक भाडे भरू शकत नाही.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माकपचे सचिव गणेश दराडे म्हणाले, ‘‘गोरगरीबांच्या स्वप्नांचा श्रेयवादामुळे चुराडा झाला आहे. महापालिकेने लोकांची मासिक भाडे देण्याची अर्थसंकल्पात तरतूद करावी. प्रोटोकॉलचे पालन न झाल्यामुळे सोडत रद्द करण्याची भूमिका अतिशय निषेधार्ह आहे. कोणालाही हक्काच्या घरापासून वंचित ठेवणार नाही, अशी घोषणा राजकारणी करताहेत, परंतु प्रत्येक योजनेत राजकारण सुरू आहे.’

भाऊ, पंधरा तारखेला मतदानाला यायचंच...

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य गरीब जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत. आवास योजनेची सोडत रद्द झाली म्हणून महापौरांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी आंदोलन करता येत नाही. आयुक्तांनी, महापौरांचा राजीनामा घ्यावा.’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give houses poor early instead of doing politics Various organizations demand