पिंपरी : चिंचवडगावात उद्या राज्यपाल कोश्यारी

प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी दोन भागांतील जाहीर व्याख्यानांतून दोन दिवस ते सचित्र सादरीकरण करणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल कोश्यारीe sakal

पिंपरी : चिंडवडगावातील (chinchwadgaon)पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे २९ व ३० डिसेंबरला ‘प्राचीन भारतीय संस्कृती’(Ancient Indian culture) व्याख्यानमाला आणि ‘भारतीय वारसा : परिचय आणि संवर्धन’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(governor bhagtsingh koshyari) यांच्या हस्ते सकाळी दहाला याचे उद्घघाटन होईल. चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ(pune university) आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स (CCS) यांनी याचे आयोजन केले आहे. याबाबत समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी सोमवारी माहिती दिली.

राज्यपाल कोश्यारी
आरोग्य,म्हाडा, टीईटी पाठोपाठ लष्कराच्या 2019 च्या परीक्षेतही पेपरफुटी

ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय गटाने राखीगढी (हरियाणा) पुरास्थळाचे उत्खनन केले. त्यावेळी सापडलेल्या मानवी सांगाड्यांचे डीएनए विश्लेषण केले. संपूर्ण संशोधनाविषयी, तसेच प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी दोन भागांतील जाहीर व्याख्यानांतून दोन दिवस ते सचित्र सादरीकरण करणार आहेत.

भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सर्व घटकांविषयीच्या शास्त्रीय नोंदी लोकसहभागातून जमा करून त्यांची सद्यःस्थिती नोंदविणारा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. यासाठीची पहिली कार्यशाळा ३० तारखेला होत आहे. यात डॉ. प्रमोद दंडवते, डॉ. श्रीकांत गणवीर, गिरीश प्रभुणे, प्रदीप रावत, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अरुणचंद्र पाठक, रमेश पडवळ आणि मयुरेश प्रभुणे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही दिवस पारंपरिक कला आणि कौशल्यांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी सहभागींना मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com