आरोग्य,म्हाडा, टीईटी पाठोपाठ लष्कराच्या 2019 च्या परीक्षेतही पेपरफुटी

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील लेफ्टनंट कर्नलसह चौघांविरुद्ध "सीबीआय'च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून गुन्हा दाखल
Exam-Paper
Exam-PaperSakal

पुणे : आरोग्य विभाग (Health Department), म्हाडा, शिक्षक पात्रता परीक्षेपाठोपाठ (TET) लष्कराच्या 2019 मध्ये झालेल्या "क" गटाच्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या लेफ्टनंट कर्नलसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल (Case File) केला आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Anti corruption Bureau ) मागील महिन्यात मिळालेल्या माहितीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई आलोक कुमार व आलोकची पत्नी प्रियांका असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. 2019 मध्ये लष्कराकडून गट "क' पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी संबंधीत परीक्षेतील प्रश्‍नपत्रिकेची उत्तरपत्रिका संबंधित संशयित आरोपींकडे असल्याची माहिती "सीबीआय'ला मिळाली होती. त्यानंतर सीबीआयच्या पथकाकडून संशयित आरोपींवर नजर ठेवण्यात येत होती.

Exam-Paper
हडपसर : बंटर बर्नाड शाळेसमोर डंपरने पादचाऱ्याला उडवले

त्यांचे कॉलचे रेकॉर्डींग करणयात आले. त्यात चौघांनी 40 ते 50 हजार रुपयांमध्ये उत्तरपत्रिका विकल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये सीबीआयने लष्करी पेपर फुटी प्रकरणात केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल केल्याची माहिती सीबीआयच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या आर्मी ऑर्डनन्स कोअरमध्ये रायझादा हा लेफ्टनंट कर्नल म्हणून तर नाहक हा हवालदार नाहक कार्यरत आहे. तर आलोक कुमार हा रायझादा याच्या कार्यालयामध्ये काम करतो. विकास रायाझादा याने आठ सप्टेंबर रोजी सुसंता नाहकच्या पत्नीच्या मोबाईलवर परिक्षेची उत्तरपत्रिका पाठवली.

Exam-Paper
इंदापूर : रुग्णालयात मृतांचे अवशेष डुकरे खात असल्याचा प्रकार उघड

त्यानंतर नाहकने हिच उत्तरपत्रिका त्याच दिवशी प्रियंकाच्या मोबाईलवर पाठविल्याचे तपासात समोर आले. त्यासाठी विकासला 50 हजार व ४० हजार रुपये अशा दोनदा रकमा पाठविल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच संशयित आरोपींच्या मोबाईलमधील एकमेकांना पाठविलेले मेसेज पाहिल्यानंतर विकास, सुंसता, अलोककुमार, त्याची पत्नी प्रियंका यानी २०२०-२१ मध्ये झालेल्या विविध परिक्षेच्या उत्तरपत्रिका फोडल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सीबीआयने नवीन गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com