पिंपरी : रेशनकार्ड नाही, पण धान्य हवंय; मग 'या' तारखेपर्यंत अर्ज करा

सकाळ वृत्तेसवा
रविवार, 24 मे 2020

कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेल्या व्यक्ती अथवा कुटुंबांना मोफत 5 किलो तांदळाचे वितरण करण्यासाठी भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विभागामधील एकूण 52 रास्त भाव दुकाने निश्‍चित करण्यात आली आहेत.

पिंपरी : कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेल्या व्यक्ती अथवा कुटुंबांना मोफत 5 किलो तांदळाचे वितरण करण्यासाठी भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विभागामधील एकूण 52 रास्त भाव दुकाने निश्‍चित करण्यात आली आहेत. इच्छूक विनाशिधापत्रिकाधारकांनी 30 मेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार आत्मनिर्भर भारत सहाय्य योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेल्या व्यक्ती अथवा कुटुंबाला मे आणि जून 2020 या दोन महिन्यांठी प्रत्येकी 5 किलो मोफत तांदूळ दिला जाणार आहे. त्याचे वितरण ऑफलाइन पद्धतीने केले जाणार आहे. शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, इच्छूक विनाशिधापत्रिकाधारक लाभार्थ्याला आधारकार्ड किंवा कोणतेही शासकीय ओळखपत्र सादर करणे आवश्‍यक राहील. त्याची पुराव्यादाखल स्वतंत्र नोंद केली जाईल. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मे आणि जून महिन्यासाठी या तांदळाचे वितरण जून महिन्यात होणार आहे. मोफत तांदूळ मिळविण्यासाठी इच्छूक व्यक्तींनी संबंधित परिमंडल अधिकारी, तलाठी, स्थानिक नगरसेवक अथवा रास्त भाव धान्य दुकान यांच्याकडून अर्ज न्यावेत. तसेच ते अर्ज भरून पुन्हा त्याच रास्त भाव दुकानात 30 मेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विभाग, अन्नधान्य पुरवठा केंद्रप्रमुख व त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे : 

- अ विभाग (चिंचवड) : स्नेहल गायकवाड 9082521493, वशिष्ट पांचाळ 9822661692
- फ विभाग (भोसरी) : वंदना साबळे 9011243092, अमृता सूर्यवंशी 8554882724
- ज विभाग (पिंपरी) : तुषार नावडकर 8793327103, अनिता शिंगारे 9922839918


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grain will be available at 52 shops in Pimpri for those who do not have ration card