
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिकेतर्फे महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी : "स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संकल्पनेवर आधारित राष्ट्र निर्मितीसाठी आणि मानव कल्याणासाठी आपले आयुष्य पणाला लावून सतत संघर्षशील राहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. तसेच, नवोदित पिढीसाठी ते दीपस्तंभासारखे प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहे,'' असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी येथे रविवारी (ता. 6) केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिकेतर्फे महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसे गटनेते सचिन चिखले, 'अ' प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर, माजी नगरसेवक रामचंद्र माने, अंकुश कानडे, मारुती भापकर, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड, बापूसाहेब गायकवाड, गणेश भोसले, धम्मराज साळवे, प्रकाश भुक्तर, राहुल सोनवणे, लक्ष्मण माने उपस्थित होते.
देहूगावात कार्यक्रम
देहूगाव चव्हाणनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देहूरोड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण कणसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती, चव्हाणनगर, देहूगाव यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
समता सैनिक दलाची मानवंदना
समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सकाळी साडेनऊ वाजता भारतीय बौद्ध महासभेचे (पश्चिम) जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ यांच्या हस्ते मानवंदना दिली. भारतीय बौद्ध महासभेचे (पश्चिम) जिल्हा सरचिटणीस राधाकांत कांबळे, कोशाध्यक्ष भीमराव ढोबळे उपस्थित होते. त्यानंतर मावळ तालुक्यातील देहूरोड, तळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समता सैनिक दल मानवंदना दिली. देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराजवळदेखील सैनिक दलाने संचलन केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रक्तदान शिबिर
समता सैनिक दलाने शहरपातळीवर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संविधान चौक घरकुल चिखली आणि महात्मा फुलेनगर धम्मदीप बुद्धविहार दापोडी येथे अभिवादन राज्यस्तरीय रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 200 पिशव्या रक्त संकलित केल्याची माहिती पिंपरी चिंचवड संघटक मनोज गरवडे यांनी दिली.
मास्क, सॅनिटायझरचे वाटप
मातंग एकता आंदोलनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संघटनेचे अध्यक्ष दत्तू चव्हाण यांच्या हस्ते अभिवादन केले. संघटनेतर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन वाघमारे, जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सुनील भिसे, शहर युवकाध्यक्ष विशाल कसबे, उपाध्यक्ष साहेबराव तुपे, नितीन घोलप, सचिन दुबळे, विठ्ठल कळसे, वसंत वावरे, दीपक लोखंडे, गणेश खंडाळे, दत्ता थोरात उपस्थित होते.