पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांच्या फिटनेससाठी एच. ए. कंपनीने घेतला पुढाकार

Police-Health-Checking
Police-Health-Checking

पिंपरी - हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स (एच.ए) कंपनीने पोलिसांसाठी सुरु केलेले शारीरिक तपासण्यांचे शिबीर कौतुकास्पद आहे. हेल्थ कियॉस्क मशीनच्या माध्यमातून 23 तपासण्या होणार असल्याने पोलिसांचा फिटनेस समजण्यास मदत होणार आहे. त्याकरिता पोलिसांनी आहार व व्यायामासाठी वेळ द्यायला हवा. पोलिस सतत नागरिकांच्या संपर्कात असतात. अशा कोविड संसर्ग परिस्थितीत वेळोवेळी पोलिसांच्या शारीरिक तपासण्या होणे अत्यावश्‍यक आहे. पोलिस वॉरिअरच्या भूमिकेत जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत. अशा कठीण परिस्थितीत पोलिसांचे शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे काम एच. ए. कंपनीने केल्याचे पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरीतील हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स कंपनीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांच्या हस्ते आरोग्य तपासनीस प्रारंभ झाला. पोलिस आयुक्तालया अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस अधिकारी, वाहतूक पोलिस व कर्मचाऱ्यांचे 3 ऑक्‍टोंबरपर्यंत हेल्थ चेकअप सुरु राहणार आहे. तब्बल तीन हजार पोलिसांच्या शारीरिक तपासण्या होणार आहेत. बरेच पोलिस पॉझिटिव्ह सापडत असल्याने पूर्वखबरदारी म्हणून एच. कंपनीने पुढाकार घेऊन हा स्तुत्य उपक्रम पोलीस बांधवांसाठी राबवला आहे.

यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलिस आयुक्त व जनसंपर्क अधिकारी आर .आर. पाटील व अन्य पोलीस अधिकारी तसेच एचएएलचे प्रतिनिधी डीजीएम-फायनान्स सी.व्ही. पुरम, डीजीएम-ऑपरेशन्स अनुज कुमार सिंह, एचएलचे जनसंपर्क अधिकारी अविनाश थोपटे, वितरण विभागचे आनंद यादव, टेक्‍निकल विभागाचे इनचार्ज अभय अगरवाल उपस्थित होते. कृष्णा प्रकाश यांनी ज्ञानेश्‍वरीतील ओवीतून शरीर स्वास्थायाचे महत्त्व सांगितले.

खासदार बारणेंनी लोकसभेत उठवला आवाज; केंद्र सरकारकडे केल्या 'या' दोन मागण्या

या होणार पोलिसांच्या तपासण्या
कंपनीने उत्पादित केलेल्या 'क्‍लिनिक ऑन क्‍लाऊड' मशीनवर एकूण 23 तपासण्या पोलिसांच्या होणार आहेत. प्रथम दिवशी दोनशे पोलिसांचे हेल्थ चेकअप पार पडणार आहे. यामध्ये वजन, बॉडी फॅट, मधुमेह, रक्तदाब, बीएमआय, बीएमआर, मसल्स, मास प्रोटीन, हिमोग्लोबिन, ताप, नाडी, डोळे तपासणीसह एमआरआय तपासणी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com