esakal | पिंपरी : दिव्यांग कुटीनो दाम्पत्याला मदतीची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

कुटीनो दाम्पत्य

पिंपरी : दिव्यांग कुटीनो दाम्पत्याला मदतीची गरज

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : जन्मतातच अंधत्व आले. तरीही सुखाचा संसाराला मात्र, नियतीची दृष्ट लागली. ऐन कोरोना काळात पत्नीला अर्धांगवायू झाल्‍याने केव्हिन कुटीनो दाम्पत्यांसमोर अंधार दाटला आहे. पत्नी अंथरुणाला खिळून आहेत. तसेच लॉकडाउनमुळे हाताला काम नाही. घर कसे चालवावे? असा प्रश्‍न या दृष्टिहीन दाम्पत्यासमोर उभा राहिला आहे. अंधारात चाचपडणाऱ्यांना माणुसकीच्या उजेडाची गरज निर्माण झाल्याने त्यांना सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा: Pimpri : मोशी येथे महिलेचा खून केल्याची घटना

संत तुकाराम नगरमध्ये शांता केव्हिन डॅनियल कुटीनो अंध दाम्पत्य स्थायिक आहे. दोघांनी वयाची साठी पार केली आहे. त्यातच आता पत्नीच्या आजारपणाची भर पडली आहे. अर्धांगवायूने त्या अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत. मात्र, अजूनही फारसा फरक पडलेला नाही. त्यांची शुश्रुषा पतीच करतात. त्यांना रुग्णालयातील उपचारांची गरज आहे. यामुळे कुटीनो दाम्पत्य चिंतेत आहे. तसेच रक्तदाबाची महागडी गोळी सुरू आहे. शिकवणी घेउन ते उदरनिर्वाह करत. मुलगी पिशव्या पॅकिंग, तर जावई रंगकाम करत. पण, कोरोनाची झळ पोहोचल्याने हाताला काम नाही. त्यांची दोन नातवंडे असून त्यांच्याही शिक्षणखर्च आहे. परिणामी दैनंदिन गरजाही कशा भागवाव्यात, असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. शांता केव्हीन डॅनियल कुटीनो यांना मदतीसाठी ९५९५५१५०३७ या नंबरवर संपर्क साधावा.

हेही वाचा: मंदिरे व इतर धार्मिक स्थळे उघडण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन

मदत पोहचत नाही.

एका अंध संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून त्या दिव्यांग दाम्पत्याला दोन वेळ जेवण पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे अशा गरजुंकरिता सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येत आहे. मात्र, ज्यांना खरी गरज आहे, त्यांच्यापर्यंत ही मदत पोहचत नाही.

‘‘शांताच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. दिव्यांगांना घराबाहेर पडल्याशिवाय पोट भरणे शक्य नाही. त्यामुळे अशा लोकांना मदत मिळायला पाहिजे.

-केव्हिन कुटीनो, अंध दाम्पत्य

loading image
go to top