हॅलो! कसे आहात? काळजी घ्या

सुवर्णा नवले
Thursday, 22 October 2020

वर्षानुवर्षे फोनवरील पहिला शब्द म्हणजे हॅलो! मात्र, आता त्याच्या जोडीला कसे आहात? बरे आहात ना, काळजी घ्या! अशी आपुलकीची वाक्‍ये ऐकायला येवू लागली आहेत. कोरोनाने भेटी-गाठीवर बंधने आणली असली तरी आरोग्याची काळजी आणि नात्यांची जपणूक ही शिकवण दिल्याचे दिसते.

पिंपरी - वर्षानुवर्षे फोनवरील पहिला शब्द म्हणजे हॅलो! मात्र, आता त्याच्या जोडीला कसे आहात? बरे आहात ना, काळजी घ्या! अशी आपुलकीची वाक्‍ये ऐकायला येवू लागली आहेत. कोरोनाने भेटी-गाठीवर बंधने आणली असली तरी आरोग्याची काळजी आणि नात्यांची जपणूक ही शिकवण दिल्याचे दिसते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होवू लागला आहे. मात्र, घरात डांबून ठेवणे म्हणजे काय याची अनुभूती प्रत्येक नागरिकाला मार्चपासून आली. ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे आणि नंतर ऑक्‍सोटर, कोरोना पॉझिटिव्ह, होम क्वॉरंटाईन, कोविड सेंटर...असे शब्द कानावर पडू लागले. अनेकांनी याची अनुभूती घेतली. आप्त-मित्र गमावले गेले. यातूनच एक भीतीदायक वातावरण निर्माण झाले. मात्र, सात महिन्यांनंतर हळूहळू लॉकडाऊन शिथिल होवू लागला. आता लोक कोरोनासोबत जगायला शिकले आहेत. मास्क आणि सॅनिटायझर वापरासह बाजारात सोशल डिस्टन्सिंग याचे पालन आता लोकांच्या सवयीचा भाग बनला आहे.

द्रुतगती मार्गावर तेलाच्या टँकरला आग, जीवितहानी नाही

क्‍लेषदायी वातावरण अनुभवल्यानंतर लोकांना एकमेकांची काळजी व दुसऱ्याबद्दल आपुलकी वाटू लागली आहे. नात्यांमध्ये गोडवा आणखी वाढला. काहींच्या नात्यातील वितुष्ट कमी झाले. एकत्र जमून भेटण्यापेक्षा मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात राहण्यावर लोकांचा अधिक भर आहे. यातूनच "हॅलो! कसे आहात,काळजी घ्या' हे शब्द परवलीचे बनले आहेत.

सणामुळे पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठा पुन्हा फुलल्या 

जात-पात, धर्माच्या भिंती भेदल्या
कोरोना काळात अंत्यसंस्कारासाठी घरातल्यांनी पाठ फिरविल्याच्या उदाहरणांबरोबरच जातपात-धर्म यांच्या भिंती भेदूनही एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आल्याचे दिसले. दवाखान्यात नेण्यापासून प्लाझ्माची मदत मिळवून देण्यापर्यंत एकमेकांच्या मदतीला मित्र परिवार धावला. रक्तासाठीही एकमेकांना मदत केली. रेडमिसिव्हर इंजेक्‍शनासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात इंजेक्‍शनासाठी नातेवाईकांनीच दिवस-रात्र धावपळ केली. बऱ्याच ठिकाणी पूर्ण कुटुंबच कोरोनाला बळी पडल्यानंतर पोटाचे हाल होऊ न देता एकमेकांना जेवणाची पाकीटे व डब्बे देखील नागरीकांनी पुरविले. हेच ऋण सर्वांनी लक्षात ठेवले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health care corona virus patient

Tags
टॉपिकस
Topic Tags: