
पिंपरी - रावेत बंधाऱ्यात होणाऱ्या पाण्याच्या प्रदूषणामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेकडून या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे या समस्येमध्ये सातत्याने भर पडत आहे. नदी प्रदूषण तात्काळ थांबवण्याची मागणी शहरवासियांनी सरकारकडे केली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या कारणांमुळे होतीय नदी प्रदूषण.....
रावेत बंधाऱ्याच्या पात्रामध्ये आजूबाजूच्या परिसरातून येणारे मैलायुक्त पाणी थेट मिसळले जात आहे. त्याठिकाणी अनेकजण गाड्यांची स्वच्छता करणे, कपडे धुणे आदी उपक्रम नियमितपणे राबवत असतात, त्यामुळे नदीमधील पाण्याच्या प्रदूषण पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
या उपाययोजना करण्याची आवश्यकता.....
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नदीमध्ये मिसळणारे मैलायुक्त पाणी मिसळणे तातडीने थांबवण्यात यावे. नदीच्या पाण्याचा गाड्या आणि कपडे धुण्यासाठी होणारा वापर तातडीने बंद करण्यात यावा. बंधारा परिसराच्या दोन्ही बाजूला तारेचे कुंपण टाकण्यात यावे, बंधाऱ्याच्या सुरक्षेसाठी तिथे दोन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीकडून करण्यात आली आहे.
सरकारी यंत्रणांशी पत्रव्यवहार
रावेत बंधाऱ्यातील प्रदूषणासंदर्भात पर्यावरण संवर्धन समितीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गिकर, महाराष्ट्र जलप्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, सुनील शेळके यांना पत्र दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.