
राज्य सरकारने 18 मे पासून विवाह नोंदणी कार्यालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मे महिन्यातील लग्नाच्या मुहूर्ताच्या शेवटच्या टप्प्यात विवाह नोंदणी झाली.
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा सर्वच घटकांवर परिणाम झाला, तसा लग्नसराईवरही परिणाम झाला आहे. लग्न समारंभातील गर्दीमधून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेकांनी लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले. त्यामुळे विवाह नोंदणी कार्यालयात यंदा निम्म्याहूनही निम्मी विवाह नोंदणी झाली आहे.
- पिंपरी-चिंचवडमधील दुकानदारांनो, सॅनिटायजर विक्रीसाठी ठेवताय, पण...!
एप्रिल महिन्यात लग्नसराईत लॉकडाऊनमुळे विवाहाचे चारही मुहूर्त टळले. एक एप्रिल ते 18 मेपर्यंत विवाह नोंदणी कार्यालये बंदच होती. त्यामुळे इच्छुक वधू-वरांना इच्छा असूनही विवाह नोंदणी करता आली नाही. विवाह नोंदणी कार्यालयात वधू-वर आणि तीन साक्षीदारांची गरज असते. परंतु संचारबंदीमुळे नवरीला नवरदेवाच्या गावी जाता येईना आणि नवरदेवाला नवरीच्या गावाला जाता येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. तर, काहींनी कोरोनाच्या भीतीमुळे लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले आहेत.
तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार
राज्य सरकारने 18 मे पासून विवाह नोंदणी कार्यालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मे महिन्यातील लग्नाच्या मुहूर्ताच्या शेवटच्या टप्प्यात विवाह नोंदणी झाली. परंतु तुलनेत हे प्रमाण खूपच कमी राहिले. जून महिन्यात दररोज साधारण तीन ते चार इच्छुक वधू- वरांकडून विवाह नोंदणी केली जाते. परंतु मागील आठवड्यात एकही विवाह नोंदणी झाली नाही.
आदिवासी भागातील पूजा शिवाजी भोईर हिची झाली तहसीलदारपदी निवड
लॉकडाऊनमुळे काही इच्छुक वधू-वरांनी विवाह नोंदणी पुढे ढकलली आहे. तर जिल्हाबंदीमुळे वधू-वरांपैकी एकाला आपापल्या शहरात अडकून पडावे लागले. त्यामुळे विवाह नोंदणी होऊ शकली नाही. आता लग्नाचा सीझन संपत आला असून, दिवाळीच्या कालावधीत मुहूर्तावर विवाह नोंदणीत वाढ होईल.
- भालचंद्र पोळ, विवाह नोंदणी अधिकारी, पुणे
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
2019 मधील तीन महिन्यांतील विवाह नोंदणी (कंसात 2020 मधील स्थिती) :
मार्च | एप्रिल | मे |
541 | 585 | 751 |
(336) | (0) | (84) |