esakal | बापरे! पिंपरी-चिंचवडमधील 'या' प्रभागात एवढे थुंकीबहाद्दर 
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे! पिंपरी-चिंचवडमधील 'या' प्रभागात एवढे थुंकीबहाद्दर 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून 21 लाखांचा दंड वसूल; चार महिन्यातील कारवाई 

बापरे! पिंपरी-चिंचवडमधील 'या' प्रभागात एवढे थुंकीबहाद्दर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर महापालिकेने बंदी घातली आहे. मात्र, तरीही रस्त्यांवर थुंकण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. गेल्या चार महिन्यात आरोग्य विभागाने नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सात हजार 518 या नागरिकांकडून तब्बल 21 लाख 47 हजार 950 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात महापालिकेच्या 'ग' प्रभागातील सर्वाधिक एक हजार 615 थुंकीबहाद्दरांवर पाच लाख 54 हजार 100 दंडात्मक कारवाई केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनापासून बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सरकारकडून स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही शहरात मास्क न लावता विनाकारण रस्त्यावर फिरणारे तसेच, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल ते ऑगस्ट चार महिन्याच्या कालावधीत महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयातर्गंत बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या चार हजार 603 जणांकडून सहा लाख 90 हजार 450 रुपये आणि तोंडाला मास्क न लावणाऱ्या दोन हजार 915 जणांकडून 14 लाख 57 हजार 500 दंड वसूल केला आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेविकेलाच ठेकेदाराकडून दमदाटी 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यात 'ग' प्रभागातील सर्वाधिक एक हजार 615 बेशिस्त नागरिकांचा समावेश आहे. त्यांच्यावर पाच लाख 54 हजार 100 दंडात्मक कारवाई केली आहे. त्याखालोखाल 'फ' प्रभागातील एक हजार 169 नागरिकांकडून तीन लाख 35 हजार 650 दंड वसूल केला आहे. त्यानंतर 'ड' प्रभागातील एक हजार 59 नागरिक बेशिस्त असून, त्यापैकी 634 जणांवर रस्त्यावर थुंकल्यामुळे 95 हजार 100 आणि 425 जणांनी मास्क न वापरल्यामुळे त्यांच्याकडून दोन लाख 12 हजार 500 रुपये वसूल केले आहेत. त्यानंतर 'ह' प्रभागातील 845 जणांकडून दोन लाख 42 हजार 250 रुपये दंड वसूल केला आहे. अशाप्रकारे इतर प्रभागातील नागरिकांकडून 21 लाख 47 हजार 950 रुपयांचा दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले. 

प्रभाग/ दंडात्मक कारवाई केलेले नागरिक/ वसूल केलेला दंड 
/896/1,96,000 
/694/1,99,300 
/679/2,00,200 
/1059/3,07,600 
/561/1,12,850 
/1169/3,35,650 
/1615/5,54,100 
/845/2,42,250 

एकूण - 7 हजार 518- 21 लाख 47 हजार 950 दंड  

Edited by Shivnandan Baviskar

 
 

loading image
go to top