डिजिटल हेल्थ एटीएमनंतर 'एचए' कंपनीने बनवलं हे नवं मशीन, काय आहे वाचा

डिजिटल हेल्थ एटीएमनंतर 'एचए' कंपनीने बनवलं हे नवं मशीन, काय आहे वाचा

पिंपरी : हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीने डिजिटल हेल्थ एटीएमनंतर आता 'स्वयंचलित हॅंड सॅनिटायजर डिस्पेन्सर' बनविण्याकडे पाऊल टाकले आहे. या मशीनमधून थर्मल तपासणीदेखील करता येणे शक्‍य होणार आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी हे मशिन सर्व कंपन्या व किरकोळ विक्रेत्यांना बहुउपयोगी ठरणार आहे. परिणामी, कोरोना उत्पादनाच्या माध्यमातून कंपनीला नवसंजीवनी मिळून पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

एचए कंपनीने मागील आठवड्यात हे मशिन भारतभर विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मशिन पूर्णत: स्वयंचलित आहे. थर्मल स्क्रिनिंगसोबत अल्कोहोल हँड डिसीइनफेक्टट आहे. त्यामुळे हातावरचे विषाणू मारण्यास मदत होणार आहे. डिस्पेंसर आकाराने लहान असून, मॉल्स, मंदिर, दुकाने, कार्यालये कोठेही वापरण्यासाठी सोपे आहे. सर्वसामान्यांना देखील परवडण्यासारखे आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मशीनमध्ये सेंसर असल्याने थर्मल तपासणीद्वारे पूर्वसूचना लक्षात आल्याने संसर्ग पसरण्यासाठी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर 2 सेंटीमीटर अंतरावरूनच मशिन समोर उभा राहिल्यास स्वयंचलित पद्धतीने तपासणी होत आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापूर्वी एचए कंपनीने डिजीटल हेल्थ एटीएम (कियॉस्क मशिन) बाजारात आणले. त्यातून 23 तपासण्या करणे शक्‍य झाले आहे. कोरोनाच्या तपासणीसह मधुमेह व किडनीचे विकार असलेल्यांसाठी हे मशिन उपयुक्त ठरत आहे. दवाखान्याची पायरी न चढता रिपोर्टदेखील पाच मिनिटांत मिळत असल्याने या मशीनची मागणी वाढली आहे. पिंपरी व पुणे महापालिका, कॅन्टोन्मेंटशी संलग्न कार्यालयात हे मशिन बसविण्यास सुरुवात झाली आहे.

असे आहे हे मशिन

  • आठ लिटर लिक्‍क्‍डिची क्षमता
  • 2.5 एमएल प्रत्येक व्यक्तीपाठीमागे
  • मशीनचे वजन तीन ते चार किलो
  • स्वयंचलित पद्धतीने वापर

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एचए कंपनीने फेस शिल्ड, एन 95 मास्क, पीपीई कीट, डिस्पोजल बॅग, शू कव्हर, ग्लोव्हजनंतर आता स्वयंचलित सॅनिटायजर डिस्पेंसर बनविले आहे. बाजारात सध्या संसर्गाची स्थिती लक्षात घेता, हे मशिन गरजेचे आहे. नागरिक आरोग्याकडे काटेकोरपणे लक्ष द्यायला लागले आहेत. त्यापासून बचावाकरिता उपयुक्त ठरत आहे.
- नीरजा सराफ, हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स कंपनी, पिंपरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com