Hinjewadi News : आयटीनगरी हिंजवडीत सरपंचपदाच्या उमेदवाराचा अर्ज प्रति स्पर्ध्याने फाडला; सदस्यावर गुन्हा दाखल

आयटीनगरी हिंजवडीत सरपंच निवडीवरून नाट्यमय घडामोडी
hinjewadi gram panchayat
hinjewadi gram panchayatsakal

हिंजवडी - आयटी नगरी हिंजवडीच्या सरपंच निवडणूक प्रक्रियेदरम्यान सोमवारी (ता. २५) ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात प्रचंड धुसफूस पाहायला मिळाली. सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचा अर्ज प्रतिस्पर्धी उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर फाडला.

त्या ग्रामपंचायत सदस्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंडल अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत नाईकवाडी यांनी हिंजवडी पोलीसात फिर्याद दिली त्यानुसार

ग्रामपंचायत सदस्य मयूर राजेंद्र साखरे (रा. हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेली माहिती अशी, सरपंच पदासाठी मयूर साखरे आणि गणेश बन्सीलाल जांभूळकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. सोमवारी मंडळ अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत नाईकवाडी यांच्या उपस्थितीत अर्ज भरल्यानंतर अर्जाची छाननी सुरु होती.

यावेळी जांभूळकर यांच्या अर्जावर हरकत घ्यायची असल्याचे सांगून मयूर साखरे यांनी गणेश जांभुळकर यांचा सरपंच पदाचा उमेदवारी अर्ज घेतला आणि तो फाडून टाकला. त्यानंतर तो अर्ज साखरे यांनी स्वतःकडे ठेऊन घेत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

आयटीच्या सरपंचपदाची माळ गळ्यात पडावी म्हणून गेल्या महिन्याभरापासून हिंजवडीत अनेक खलबते सुरू होती. शह- कटाशहाच्या राजकारणात विविध गट-तट, नेते, पुढारी सर्वस्व पणाला लावून काशिशीने प्रयत्न करत होते.

सत्तेच्या बेरजेची जुळवाजुळव करण्यासाठी सदस्य फोडाफोडीही सुरू होती. त्यामुळे निवडणूकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हिंजवडी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता तरी देखील या अनुचित प्रकाराला आयटी नगरीला सामोरे जावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com