नेकलेस नव्हे, हिंजवडी आयटीतील ट्रॅफिक | Traffic | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेकलेस नव्हे, हिंजवडी आयटीतील ट्रॅफिक
नेकलेस नव्हे, हिंजवडी आयटीतील ट्रॅफिक

नेकलेस नव्हे, हिंजवडी आयटीतील ट्रॅफिक

वाकड - आयटी नगरी हिंजवडी फेज दोन विप्रो सर्कल चौकात मेट्रोला अडथळा ठरणाऱ्या उच्चदाब विजवाहिनी भूमिगत करण्यासाठी एमआयडीसीने एका बाजूचा रस्ता खोदला आहे. त्यामुळे एकच लेन सूरु आहे त्यात येथे वाहतूक पोलीस नसल्याने सायंकाळी ५ ते ७ या वेळेत वाहनांच्या अशा रांगा लागत आहेत.

दिवाळी झाल्यानंतर काही कंपन्यांनी कमी क्षमतेवर आयटी अभियंत्यांना कामावर रुजू केले आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी नगरीतील वाहतुकीत भर पडली आहे. मात्र एमआयडीसीतील फेज २, ३ ऐंबेयेसी, विप्रो वरून येणारी वाहने तसेच, येथे जागा नसल्याने वाहने वाळविता येत नाहीत. त्यामुळे ते यु टर्न घेऊन वळून येतात. त्यामुळे येथे वाहतूक खोळंबते. परिणामी, वाहनांच्या रांगा लागत आहेत. याबाबत अनेक आयटी अभियंत्यांनी नाराजी व्यक्त करीत काम त्वरित पूर्ण करावे व वाहतूक पोलिसांनी पोलीस कर्मचारी नेमावेत अशी मागणी सकाळच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये आज ४३ नवीन रुग्ण

येथे एमआयडीसीच्या वतीने वीज वहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. रस्ता खोदल्याने एकच लेन सुरू आहे. येथे नियमित पोलीस कर्मचारी नेमलेले असतात तरीही रस्ताच लहान असल्याने अशी समस्या येते. एमआयडीसीने त्वरीत काम पूर्ण करावे.

- विठ्ठल कुबडे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी वाहतूक विभाग)

loading image
go to top