चिखलीत खोदकाम करताना सापडला इतिहासकालीन सोन्याच्या नाण्यांचा साठा 

historical gold coins found during excavations in the Chikhali
historical gold coins found during excavations in the Chikhali

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे बांधकामासाठी खोदकाम करताना इतिहास कालीन सोन्याच्या नाण्यांचा साठा सापडला. ५२६ ग्रॅमच्या कांस्य धातूसारख्या तुटलेल्या तांब्यात दोन हजार ३५७ ग्रॅम वजनाची सापडलेली २१६ नाणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.  

सलाम सालार खा पठाण (रा. विठ्ठल नगर झोपडपट्टी, नेहरूनगर, पिंपरी) याने त्याच्या घरात सोन्याची नाणी बाळगली असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पठाण याच्या घरातून नाणी जप्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पठाण याचे सासरे मुबारक शेख, मेव्हणा इरफान शेख (दोघेही रा. पाथरी, जि. परभणी) हे तीन ते चार महिन्यांपूर्वी मजुरीच्या कामासाठी पठाण याच्याकडे आले होते. ते दोघे चिखली येथील बांधकामावर बिगारी म्हणून काम करीत होते. तेथे खोदकामाची माती फावड्याने भरत असताना सोन्याची पाच सहा जुनी नाणी त्यांना मातीत मिळून आली. ती नाणी त्यांनी सदाम पठाण याला दाखवली. दुसऱ्या दिवशी सदाम पठाण व त्याचा मेव्हणा मुबारक शेख यांनी मातीचा ढीग उकरला असता तेथे कांस्य धातूसारखा तांब्या व सोन्याची नाणी मिळाली. ती नाणी त्यांनी सदाम याच्या घरी आणून ठेवली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इतिहास कालीन ही नाणी १७२० ते १७५० या कालखंडातील आहेत. त्यावर उर्दू व अरबी भाषेत राजा मोहम्मद शाह यांची मुद्रा उमटविण्यात आली असल्याची पुरातत्त्व विभागाकडून माहिती मिळाली आहे. सोन्याच्या सध्याच्या बाजारभावाने एका नाण्याची किंमत ७० हजारांपर्यंत आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com