esakal | पिंपरी शहरात हॉकर्स नियोजन काम सुरू; राजेश पाटील यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Patil

पिंपरी शहरात हॉकर्स नियोजन काम सुरू; राजेश पाटील यांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरातील हॉकर्स नियोजन (Hockers Management) काम (Work) सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक भागाचा विचार करून व्यवस्थापन केले जाईल. पर्यटनाच्या (Tourism) दृष्टीने नियोजन केले जात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिली. (Hockers Management Work Start in Pimpri City Rajesh Patil)

निगडी येथील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत आयुक्त बोलत होते. ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका मंगला कदम, वैशाली काळभोर, अनुराधा गोरखे, मीनल यादव, नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे, प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: लग्नास होकार न मिळाल्याने तरूणाची आत्महत्या

त्यांनी जीर्ण, विद्युत तारांना अडथळा ठरणारे व धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, हॉकर्सचे अतिक्रमण आणि व्यवस्थापन, ट्रांझिट कॅम्प, पाणीपुरवठा, नाल्यांची कामे, रस्त्यांवरील खड्डे, पदपथावरील अतिक्रमणे, शाहूसृष्टी, सायन्स पार्क येथील तारांगण, विविध उद्यानांची कामे, रेंगाळलेली कामे, बर्ड व्हॅलीतील कामे, नालेसफाई, जलनि:सारणची कामे याबाबत सूचना मांडल्या. क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, सहशहर अभियंता प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, सुनील वाघुंडे, रामनाथ टकले, अनिल शिंदे, संदेश चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एस. शिंदे आदी उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, ‘‘प्रत्येक कामाचे ऑडिट केले जाणार असून, निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी. नियमबाह्य कामे, कामचुकारपणा आणि निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करून कारवाई केली जाईल. अतिक्रमणांवर कारवाई करा. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रभाग स्तरावर नियोजन सुरू असून, कोविड दक्षता समिती स्थापन केली जात आहे. नागरिकांनी संपर्क केल्यानंतर अधिकाऱ्यांनी उपलब्धता दाखविली पाहिजे.’’ प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्राची माहिती आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता साळवे यांनी दिली.

loading image