Hinjewadi Crime : भागीदारीत हॉटेल व्यवसाय करण्याच्या बहाण्याने २ कोटी ३६ लाखांची फसवणूक

मैत्रीचा फायदा घेत विश्वास संपादन करून भागीदारीमध्ये हॉटेल व्यवसाय चालु करण्याचे आमिष दाखवून तरुणाला तब्बल २ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.
fraud
fraud sakal

हिंजवडी - मैत्रीचा फायदा घेत विश्वास संपादन करून भागीदारीमध्ये हॉटेल व्यवसाय चालु करण्याचे आमिष दाखवून तरुणाला तब्बल २ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत चौघा विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निखिल सुरेश पवार (वय ३५, आग्रा रोड, कल्याण (प) ठाणे) यांनी हिंजवडी ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रजित दिनेश चंद्रा (रा. फेज दोन कोलते पाटील सोसायटी, मारूंजी) या मुख्य आरोपीसह कमलेश सिन्हा, मृगांका शैला, तोशिक शहा या त्याच्या साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ यांनी दिलेली माहिती अशी, आरोपी रजित चंद्रा याने ओळखीचा फायदा घेत फिर्यादी व त्यांच्या आई-वडीलांचा विश्वास संपादन करून वाकड येथे भागीदारीत हॉटेल व्यवसाय सुरु करण्याचा प्लॅन आखला.

भागीदारीतील हॉटेलच्या गुंतवणुकीसाठी फलॅट विक्री करून तसेच मित्र गौरव चंद्रा याच्याकडुन पैसे घेवुन भरतो असे आरोपीने सांगीतले. मात्र ते भरले नाही प्रत्यक्षात हॉटेल चालु झाल्यानंतर त्याच्या हिश्याच्या नफ्यातील पैसे देतो असे आमिष दाखवले.

हॉटेलचे डिपॉझिट, इंटेरीयर, मटेरीयल व इतर खर्चासाठी तसेच हॉटेल चालु केल्यानंतर सरकारी परवानगी, सर्व स्टॉक व इतर खर्चासाठी वेळोवेळी २ कोटी ३६ लाख रूपये गुंतवण्यास भाग पाडुन आर्थिक फसवणुक केली आहे.

हॉटेल व्यवसायासाठी मे. कारा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. नावाची कंपनी रजिस्टर करण्यात आली होती. या कंपनीत ३० टक्के हिस्सा असतानाही फिर्यादीला हॉटेल व्यवसायातुन बेदखल करून हॉटेलचे सर्व कामकाज स्वत: कडे घेत हॉटेलवर येण्यास प्रतिबंध केला. व्यवसायातुन मिळणा-या पैशाचा अपहार केला.

फिर्यादीच्या संमतीशिवाय बनावट कागदपत्र तयार करून आरोपीची आई नामे कमलेश सिन्हा या डायरेक्टर असल्याचे दाखविले तर मृगांका विनय शैला यांना संमतीशिवाय बनावट कागदपत्र तयार करून कंपनीचे डायरेक्टर बनवून फसवणुक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com