'मी इथला भाई आहे, तुला संपवतोच' असं म्हणत हॉटेलचालकावर प्राणघातक हल्ला

'मी इथला भाई आहे, तुला संपवतोच' असं म्हणत हॉटेलचालकावर प्राणघातक हल्ला

पिंपरी : जेवणाच्या कारणावरून हॉटेलचालकाशी झालेल्या वादात बारा जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली, तर त्यातील एकाने 'तुला माहीत नाही का, मी इथला भाई आहे, आता तुला संपवतोच', अशी धमकी देत हॉटेलचालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना पिंपळे निलख येथे घडली. अमोल धुमाळ, अक्षय राक्षे, अभि मोरे यांना अटक केली असून अंबादास पासलकर, राजू फडतरे सर्व (रा. पिंपळे निलख) यांच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अक्षय अशोक चव्हाण (रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी यांचे पिंपळे निलख येथे बाणेर रोडला हॉटेल असून,  मंगळवारी (ता. १६) रात्री सव्वा आठच्या सुमारास आरोपी तेथे जेवणासाठी गेले होते. त्यावेळी जेवणाच्या कारणावरून आरोपी व फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी अमोल धुमाळ याच्या ओळखीचे इतर सर्व आरोपी पुन्हा हॉटेलात आले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादीला शिविगाळ करून हाताने मारहाण करीत दगड फेकून मारले, तर आरोपी अंबादास पासलकर याने फिर्यादी यांना 'माझ्या पोरांना जेवण देत नाही का, तुला एवढा माज आला आहे का, तुला माहित नाही का मी इथला भाई आहे, तुला आता संपवतोच', अशी धमकी देत कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com