लोणावळा गजबजले, हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल्ल!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

लोणावळा(पिंपरी) : खंडाळा परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर बाजारपेठ गजबजल्या असून, हॉटेल व रिसॉर्ट चालकांनी पर्यटकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हॉटेल, रिसॉर्टसह बंगले मालकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी मुंबईतून गोवा, कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे आज मुंबई-गोवा महामार्गही ठप्प झाला होता. सकाळपासून दुपारपर्यंत वाहनांची रीघ पाहायला मिळाली.

"मीच घरकुलचा डॉन आहे' म्हणत तेरा वाहनांची तोडफोड; तरूणावर प्राणघातक हल्ला

लोणावळा, कार्ला, मळवली, पवनानगर परिसरातील भुशी डॅम, लोणावळा तलाव, तुंगार्ली तलाव, राजमाची, कुणे गाव, रायवूड, लोहगड, एकवीरा-भाजे लेणी परिसर, पवना धरण परिसरातील सेकंड होम्स, खासगी बंगल्यामध्ये पर्यटकांचे वास्तव्य असते.  लोणावळा परिसरासह ग्रामीण भागांकडेही पर्यटकांचा कल वाढत आहे. शुक्रवारपासूनच (ता. २५) पर्यटकांची वर्दळ वाढल्याने ऐन वीकएंडला बोरघाटात द्रुतगती मार्गावर, तसेच लोणावळा-खंडाळ्यात जुन्या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hotels, resorts are housefull in Lonavla