माणुसकी अजूनही जिवंत!; अखेर वेदिकाला दिली १६ कोटींची लस

माणुसकी अजूनही जिवंत आहे! पालकांनी मानले जनतेचे आभार
माणुसकी अजूनही जिवंत!; अखेर वेदिकाला दिली १६ कोटींची लस

पिंपरी : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये भोसरीतील वेदिका सौरभ शिंदे या SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झालेल्या ११ महिन्यांच्या बाळाला zolgensma ही लस अमेरिकेतून आयात करून देण्यात आली. वेदिकाला दोन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर सर्व आवश्यक चाचण्या डॉक्टरांनी केल्या. त्यानंतर लस देण्यात आली. तिची किंमत सोळा कोटी रुपये आहे. विदेकाची प्रकृती चांगली आहे.

''लसीवरील आयात शुल्क माफ करण्याकरिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाशी व केंद्रीय वित्त मंत्रालयाबरोबर पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेऊन केंद्र सरकारने आयातशुल्क व कर माफ केले आहे. यासाठी अभिनेते निलेश दिवेकर आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे सचिव संकेत भोंडवे यांचे योगदान मोलाचे होते'' अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली.

माणुसकी अजूनही जिवंत!; अखेर वेदिकाला दिली १६ कोटींची लस
आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुकमध्ये बिबट्या घुसला अन्...

वेदिका अवघी आठ महिन्यांची असताना तिला SMA TYPE 1 हा दुर्मिळ आजार झाला असल्याचे निदर्शनास आले. या आजारावर zolgensma ही लस देणे गरजेचे होते. त्यासाठी वेदिकाचे वडील सौरभ आणि स्नेहा शिंदे यांनी लोकनिधी व सीएसआर मार्फत तब्बल १६ कोटी रुपये जमा केले. ज्या दात्यांनी आपापल्या परीने शक्य होईल तेवढी मदत केली. सर्व जनतेने आशीर्वाद दिले या सगळ्यांच्या कष्टाचे आज फळ मिळाले आणि वेदिकला लस भेटली अशी भावना वेदिकाच्या पालकांनी व्यक्त केली.

एक खूप अशक्य वाटणारी लढाई शक्य झाली याचे सर्व श्रेय दात्यांना तसेच ज्यांनी ज्यांनी ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे मदत केली अशा सर्व व्यक्तींचे, उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर व त्यांचे सहकारी या सर्वांचे शिंदे कुटुंब शतशः ऋणी राहील, माणुसकी अजूनही जिवंत आहे हेच या १६ कोटींच्या लढाईतून सिद्ध झाले आहे.

माणुसकी अजूनही जिवंत!; अखेर वेदिकाला दिली १६ कोटींची लस
पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध कायम!

मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार अनेक राजकीय मंडळी, पत्रकार तसेच देशातील जनतेबरोबर विदेशातून देखील वेदिकासाठी मदतीचा ओघ सुरू होता. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विशेष प्रयत्न करून शक्य तितकी मदत केली , संसदेत अशा आजारांसाठी विशेष तरतूद करावी अशी मागणी देखील केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com