esakal | आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुकमध्ये बिबट्या घुसला अन्..
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुकमध्ये बिबट्या घुसला अन्...

आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुकमध्ये बिबट्या घुसला अन्...

sakal_logo
By
सुदाम बिडकर

पारगाव : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील वरच्याहिंगे मळ्यात गेली दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर असुन बिबट्या व बिबट्याच्या दोन बछड्यांनी मागील पंधरवड्यात 100 गावठी कोंबड्या व डॉबरमॅन जातीचा कुत्र्याचा फडशा पाडला आहे. त्यामुळे संबधीत शेतकऱ्य़ांचे मोठे नुकसान झाले आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध कायम!

अवसरी बुद्रुक गावच्या दक्षिणेला असलेल्या हिंगेमळ्याच्या परिसरातून डिंभे धरणाच्या उजवा कालवा गेल्याने या परिसरातील शेती बारमाही बागायत आहे. या ठिकाणी अनेक वेळा बिबट्याने हल्ला केल्याच्या अथवा दर्शन दिल्याच्या घटना घडल्या आहेत. काल मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास विष्णू हिंगे व सागर हिंगे यांच्या पोल्ट्रीमध्ये आवाज आल्याने बिबट्या पोल्ट्रीत शिरल्याचा संशय आल्याने निवृत्त लेफ्टनंट कमांडर अभिजीत हिंगे यांनी तात्काळ सागर हिंगे यांना फोन करून घटना सांगितली. अभिजीत हिंगे व सागर हिंगे यांनी तात्काळ आपल्या चारचाकी वाहनातून पोल्ट्रीजवळ जाऊन वाहनाचा प्रखर उजेड टाकून बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोल्ट्रीतील सुमारे पाचशे गावठी कोंबड्या बचावल्या. पोल्ट्रीपासून पळत जाताना बिबट्याची मादी व दोन मोठे बछडे हिंगे यांना आढळून आले.

हेही वाचा: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच : अमोल कोल्हे

मागील पंधरा ते वीस दिवसापासून या परिसरात बिबट्याने शंभर ते सव्वाशे कोंबड्या, वसंतराव हिंगे यांचा डॉबरमॅन कुत्रा, भरत रमाजी हिंगे यांचे गायीचे वासरू बिबट्याच्या जोडीने फस्त केले आहे, त्यामुळे या परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून परिसरात मोठी लोकवस्ती आहे, त्यामुळे बिबट्याचा मानवावर हल्ला होऊ शकतो या भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत. यासंबंधी स्थानिकांनी वन विभागाशी अनेक वेळा संपर्क केला तसेच ग्रामपंचायत मार्फत पत्रव्यवहार करून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली मात्र वनखाते या घटनांकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र पुर्व आंबेगाव तालुक्यात दिसत आहे. अवसरी बुद्रुक ग्रामस्थांनी हिंगे मळा येथे तात्काळ पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच : अमोल कोल्हे

loading image
go to top