esakal | पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध कायम!
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध कायम!

महापालिका आयुक्तांची माहिती; उपमुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत निर्णय

पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध कायम!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्गाचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने शहरात निर्बंध कायम ठेवले आहेत. यामध्ये कोणतीही शिथीलता केलेली नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शुक्रवारी (ता. ११) दिली. (no change in city restrictions due to positivity rate)

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. त्यात हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. या पाचही स्तरांसाठी काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण विचारात घेता शहरातील निर्बंध ‘जैसे थे’ ठेवले आहेत.

हेही वाचा: पिंपरी : पुरातन नाणे विकणाऱ्या नऊ जणांना अटक

पुणे शहरातील ‘पॉझिटिव्हिटी रेट’ पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्याने शहरातील बंधने काही प्रमाणात शिथिल केली. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराचा रेट पाच टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने निर्बंधामध्ये शिथिलता दिलेली नाही. पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर निर्बंध शिथिल केले जाणार होते. मात्र, शहराचा मागील आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट ५.२ टक्के होता. हा रेट पाच टक्क्यांपेक्षा थोडासा जास्त असल्याने निर्बंध आणखी शिथिल केले नाहीत, अशी माहिती आयुक्त पाटील यांनी दिली.

हेही वाचा: Corona : पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५५५ जणांना डिस्चार्ज

‘‘शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटत असली, तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार ‘पॉझिटिव्हिटी रेट’ विचारात घेऊन शहरातील निर्बंधामध्ये आणखी शिथिलता देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शहरात सध्याच्या नियमावलीत कोणताही बदल केलेला नाही. तसे लेखी आदेशही काढले आहेत. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.’’

- राजेश पाटील, महापालिका आयुक्त

loading image
go to top