PMRDA : बेकायदेशीर पद्धतीने भरती केलेले ‘पीएमआरडीए’तील १२ जण सेवामुक्त

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) बारा अधिकाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे.
PMRDA
PMRDAsakal

- जयंत जाधव

पिंपरी - पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) बारा अधिकाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे. ‘सकाळ’ने गेल्या काही दिवसांपासून ‘पीएमआरडी’तील अनागोंदी कारभाराविषयी वृत्तमालिका प्रसिद्ध केली आहे.

त्यातीलच ‘सेवानिवृत्त तुपाशी व सुशिक्षित बेरोजगार उपाशी’ या मथळ्याखाली १५ ऑक्टोबरला वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचीच दखल घेऊन, ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर पद्धतीने भरती केलेले १३ सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी अजूनही कार्यरत आहेत.

दरम्यान, पुणे महापालिकेतून निवृत्त झालेले वरिष्ठ अधिकारी मागील दाराने सल्लागार म्हणून पुन्हा शुक्रवारी (ता. २०) दाखल झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. प्राधिकरणात तळ ठोकून असलेल्या अधिकाऱ्यांशी त्यांचे लागेबांधे आहेत. त्यांना कसे नियुक्त केले, ते प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शुक्रवारी सायंकाळपर्यंत माहिती नव्हते.

जाहिरात न देता विभाग प्रमुखांच्या मागणीनुसार सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची तात्पुरती नेमणूक केली होती. विवेक खरवडकर यांची सल्लागार म्हणून नेमणूक कशी झाली, हे मला माहीत नाही.

- दीपक सिंगला, अतिरिक्त महानगर आयुक्त, पीएमआरडीए

प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर परत जायला हवेत. ते मुदत संपूनही ५ ते ८ वर्षे तळ ठोकून आहेत. त्याचबरोबर सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी बेकायदेशीररीत्या घेतले जातात. त्यांची ‘पीएमआरडीए’मध्ये एक टोळी झाली आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे.

- मारुती भापकर

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शासकीय सेवेत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना पुन्हा तीन वर्षापर्यंत कामावर घेण्याचा काढलेला २०१६ चा अध्यादेश तातडीने रद्द करावा. त्या जागांवर हजारो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.

- ॲड. शशिभूषण होले, माजी कंत्राटी अभियंता, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com