प्लाझ्मादात्याला मिळेना प्रोत्साहनपर बक्षीस; महापालिकेची घोषणा हवेतच

‘प्लाझ्मादात्याला प्रोत्साहनपर दोन हजार रुपये बक्षीस देणार!’ ही महापालिकेची घोषणा हवेतच विरली आहे. असे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.
PCMC
PCMCSakal

पिंपरी - ‘प्लाझ्मादात्याला (Plasma Donar) प्रोत्साहनपर (Incentive Reward) दोन हजार रुपये बक्षीस देणार!’ ही महापालिकेची (Municipal) घोषणा (Announcement) हवेतच विरली आहे. असे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. एक महिना झाला, तरी एकालाही रक्कम (Amount) मिळालेली नाही. दात्यांना दोन हजार रुपये मिळत नाहीतच, शिवाय प्लाझ्मा घेण्यासाठी सहा हजार रुपये मोजावे लागत असल्याचा अनुभव रुग्णाच्या नातेवाइकांना येत आहे. (Incentive Reward for Plasma Donor Municipal Corporations Announcement is in Air)

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिव्हिरप्रमाणेच प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरते, असा वैद्यकीय क्षेत्रात सूर आहे. मात्र, मागील तीन महिन्यांत प्लाझ्मादान करणाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्याचाही प्रचंड तुटवडा जाणवत होता. त्यामुळे महापालिकेने दाते पुढे यावेत म्हणून त्यांना प्रोत्साहनपर दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली, जेणेकरून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा मिळतील आणि कोरोना रुग्णांचा जीव वाचेल. हा प्लाझ्मा महापालिकेच्या रक्त पेढीतच दान करावा लागणार होता. शिवाय महापालिका रुग्णालयाशिवाय इतर रुग्णांनादेखील प्लाझ्मा मोफत दिला जाणार होता. त्यावेळी २०० मिलीसाठी सहा हजार रुपये मोजावे लागत होते. अनेक पदाधिकाऱ्यांनीही आता प्लाझ्मा मोफत मिळणार, अशी घोषणा केल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला होता. वायसीएमएच रक्तपेढीकडून प्राप्त आकडेवारीनुसार, दोन वर्षांत तीन हजार ५४८ रुग्णांना एक हजार ७७० दात्यांनी प्लाझ्मा दिलेला आहे. एका दात्याकडून दोन बॅग तयार होतात.

PCMC
स्मशानभूमीत मृतदेह जळत आहेत अर्धवट

दरम्यान, या घोषणेमुळे मे महिन्यात ३४१ दात्यांनी प्लाझ्मा जमा केला. पण, रक्कम कधी मिळणार, याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. परंतु, समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. आमची फसवणूक केली का, असा प्रश्‍न निर्माण होतो, असे प्‍लाझ्मा रुग्णसेवक संजय गायके यांनी सांगितले.

प्लाझ्मादानाची स्थिती (जानेवारी ते ५ जून २०२१)

  • ३४१ - प्रोत्साहन बक्षीस प्राप्त लाभार्थी

  • ८९२ - प्लाझ्मादान केलेल्या दात्यांची संख्या

  • १७४३ - वायसीएम रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी दिलेल्या रुग्णांची संख्या

कोरोनाबाधितांना प्लाझ्मामुळे जीवदान मिळाले आहे. महापालिकेकडून दात्यांना प्रोत्साहनात्मक रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी सगळ्यांकडून बॅंक खात्याची माहिती, पॅनकार्ड, आधारकार्ड मागवले. लवकरच सगळ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. कार्यवाही करण्यास घेतली आहे.

- डॉ. शंकर मोसलगी, रक्तसंक्रमण अधिकारी, वायसीएमएच रक्तपेढी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com