

Indrayani River Improvement Project In Pimpri Chinchwad Draws Criticism As Work Order Issued Before Land Acquisition
sakal
पिंपरी : महापालिकेने इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प हाती घेतला; मात्र, नियोजनाआधीच निविदा आणि कामाचे आदेश देण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. सुमारे ४३० कोटी ७५ लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी आवश्यक बहुतांश जागा महापालिकेच्या ताब्यात नसताना कंत्राटदाराला कामाचे आदेश देण्यात आले. आता नदीकाठी भूसंपादनासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे अधिकारी व सल्लागारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.