Indrayani Thadi- 2023 : इंद्रायणी थडी’त तीन दिवसांत साडेतीन कोटींहून अधिक उलाढाल

महिला बचत गटांमध्ये उत्साह; आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमाची चर्चा
Indrayani Thadi- 2023 Women Empowerment mla mahesh landage politics
Indrayani Thadi- 2023 Women Empowerment mla mahesh landage politicssakal

पिंपरी : महिला सक्षमीकरण आणि नवोदितांना संधी या हेतूने सुरू केलेल्या ‘इंद्रायणी थडी- २०२३’ महोत्सवाला पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातून प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढला आहे. सुरुवातीच्या तीन दिवसांत तब्बल २० लाखहून अधिक नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली असून, साडेतीन कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती समन्वयक संजय पटनी यांनी दिली.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरी येथील गावजत्रा मैदानावर एकूण १७ एकर जागेत भव्य ‘इंद्रायणी थडी- २०२३ महोत्सव’ सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे महोत्सव झाला नाही. त्यामुळे यावर्षी महोत्सवाला प्रचंड गदी पहायला मिळत आहे.

महोत्सवात एकूण १ हजार महिला बचतगटांनी विविध स्टॉल लावले आहेत. खाद्य पदार्थ, सौंदर्य प्रसाधने, जीवनावश्यक वस्तू, खेळणी, पुस्तक स्टॉल, घरगुती वापरासाठी विविध छोटी यंत्रे, पर्यावरण पुरक वस्तू, कपडे, परंपरीक पोषाख, यासह विविध १५० प्रकारच्या स्टॉलवर ग्राहकांनी खेरदीला पसंती दिली आहे. खाद्य पदार्थ्यांच्या स्टॉलवरील उलाढाल लक्षवेधी असून, बचत गटांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे.

‘सेलिब्रेटीं’मुळे महोत्सवाची चर्चा...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चर्चेत आलेला पैलवान सिकंदर शेख यांच्यासह कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. दुसरीकडे, मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री, स्वप्नील जोशी यांच्यासह प्रथमेश परब, ‘मराठी सिनेतारका’, ‘चला हवा येवू द्या’, ‘महाराष्ट्राचे विनोदवीर’ अशा विविध कार्यक्रमांमुळे व त्यातील सहभागी ‘सेलिब्रेटीं’मुळे इंद्रायणी थडी- २०२३ महोत्सवाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com