
Pimpri Chinchwad News
Sakal
अमोल शित्रे
पिंपरी : उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांना अवजड समस्या भेडसावत आहेत. आधीच गुंतवणुक करून वाढत्या स्पर्धेचा सामना करणारे उद्योजक मूलभूत समस्यांअभावी त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे त्यांना मूलभूत सुविधाही पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे.