esakal | पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला

एप्रिल महिन्यात शहरातील स्थिती; बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले

पिंपरी-चिंचवडमध्ये संसर्ग वाढला; मृत्यूदर घटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : सर्वाधिक संसर्ग व मृत्यूही एप्रिल महिन्यात झाल्याचे आकडेवारीतून दिसते आहे. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबरच्या तुलनेत मृत्यूदर कमी राहिला असून, बरे झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग शहरात सुरू आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढले होते. ऑक्टोबरपासून संसर्ग कमी होऊ लागला. त्यामुळे सरकारने अनलॉकचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या महिन्याच्या (मार्च २०२१) मध्यापासून पुन्हा संसर्ग वाढू लागला. एप्रिलमध्ये त्याचे प्रमाण खूपच वाढले. त्यामुळे सरकारने ‘ब्रेक-द-चैन’ धोरणानुसार वीकेंड लॉकडाउन सुरू केले आहे. त्याची अंमलबजावणी प्रत्येक शनिवार व रविवारी केली जात आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी आठ ते अकरा या वेळेत केवळ अत्यावश्‍यक सेवा म्हणून किराणा मालाची दुकाने व भाजी मंडई सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ‘ब्रेक-द-चैन’ धोरणामुळे संसर्गाचे प्रमाण कमी झालेले नाही. मात्र, त्याची वाढ रोखण्यास यश आल्याचे दिसते आहे.

हेही वाचा: Corona : मावळातील कळकराई निम्मी पॉझिटिव्ह!

कंटेन्मेंट झोनमध्ये वाढ

मार्च अखेरीस शहरात २१४ मेजर व एक हजार २५१ मायक्रो, असे एक हजार ४६५ कंटेन्मेंट झोन होते. त्यात एप्रिल महिन्यात मोठी वाढ झाली. एप्रिल अखेरीस ३१४ मेजर व दोन हजार २३२ मायक्रो, असे दोन हजार ५४८ कंटेन्मेंट झोन होते. म्हणजेच एप्रिल महिन्यात एक हजार ८३ कंटेन्मेंट झोन वाढले आहेत. यात मेजर कंटेन्मेंट झोन १०२ ने वाढले असून, ९८१ मायक्रो झोन वाढले आहेत.

हेही वाचा: पुणे-मुंबई महामार्गावरील ढाबा पोलिसांकडून सील

दृष्टिक्षेपात एप्रिल

  • पॉझिटिव्ह : ७२,३३२

  • बरे झाले : ६७,६१४

  • मृत्यू : ९८५

सद्यःस्थिती रुग्ण

  • सक्रिय : १७३१३

  • रुग्णालयात : ३३२९

  • होमआयसोलेट : १४४८४

loading image