विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या योजना सुरू करा...

महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या विविध योजना लवकर सुरू कराव्यात अशी विद्यार्थी पालकांमधून मागणी होत आहे
Initiate schemes of Municipal Urban Settlement Department for students sangvi
Initiate schemes of Municipal Urban Settlement Department for students sangvisakal

जुनी सांगवी : महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या विविध योजना लवकर सुरू कराव्यात अशी विद्यार्थी पालकांमधून मागणी होत आहे. दरवर्षी नागरवस्ती विभागाकडून दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती , बक्षिस योजना, सायकलसाठी निधी, आदी विविध योजना लवकर राबवून सुरू करण्यात याव्यात अशी विद्यार्थी पालकांमधून मागणी होत आहे. दरवर्षीप्रमाणे नागरी सुविधा केंद्र,महा इ सेवा केंद्रांमधून विद्यार्थी व पालकांकडून गुणवंत विद्यार्थी बक्षिस योजना, शिष्यवृत्ती,अन्य अनुदान योजना याबाबत विचारणा होत आहे. नेहमीप्रमाणे अर्ज उपलब्ध कधी होणार अशी विद्यार्थी पालकांमधून विचारणा होत आहे.

याबाबत नागरवस्ती विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणा-या योजना तातडीने सुरू कराव्यात याबाबत माजी महापौर उषा ढोरे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दरवर्षी जुलैमध्ये या योजनेचे अर्ज भरायला सुरुवात होते.नेहमीप्रमाणे विद्यार्थी व पालक यांच्याकडून महा ई सेवा,नागरी सुविधा केंद्रातून चौकशी करत आहेत.

- कैलास बनसोडे, केंद्र चालक नागरी सुविधा केंद्र

यावर्षी नागरवस्ती विभागाच्या योजना पुर्णपणे ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात येणार आहेत.पालिकेचे स्वतंत्र ॲप,लिंक विकसित करण्यात येत आहे.पुढील आठवडाभरात हे काम पुर्ण होवून याबाबतची माहिती प्रसिद्धीस देण्यात येणार आहे.ज्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी अडचण येईल त्यांच्यासाठी नागरी सुविधा केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

- सुहास बहाद्दरपुरे पालिका अधिकारी नागरवस्ती विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com