पिंपरी-चिंचवडच्या महापौर म्हणतायेत, 'रुग्णांची हेळसांड होऊ देऊ नका'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

  • जम्बो रुग्णालयांची पाहणी 

पिंपरी : "कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची हेळसांड होऊ देऊ नका. औषधोपचारांबरोबरच त्यांना दिलासा देण्याचे कामही करा,'' अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी डॉक्‍टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक 

ऑटो क्‍लस्टर व मगर स्टेडियम येथील जम्बो रुग्णालयांची महापौर, महापालिका सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके व स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, नोडल अधिकारी सुनील अलमलेकर आदी उपस्थित होते. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव व रुग्णसंख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी व रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ऑक्‍सिजन बेडची सोय आहे. दोन्ही रुग्णालयांत रुग्ण दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, "रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत व रुग्णांसाठी असलेल्या सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारचा कामचुकारपणा होणार नाही. रुग्णांना गोळ्या, औषधे, लॅब, ऑक्‍सिजन पुरवठा वेळेत उपलब्ध करून देण्यात यावा,'' असा आदेशही महापौर ढोरे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लि

'सातारा', 'कोल्हापूर'कडून पाहणी 

सातारा जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी ऑटो क्‍लस्टर येथील कोविड हॉस्पिटलची पाहणी केली. नियोजनाबाबतची माहिती जाणून घेतली. त्याबाबत अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

रुग्णालयांत उपलब्ध बेड 
रुग्णालय.....आयसीयू.....ऑक्‍सिजन....एकूण 
ऑटोक्‍लस्टर.....50......150.....200 
मगर स्टेडीयम....200....600....800 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of Jumbo Hospital by Mayor Usha Dhore