esakal | पिंपरी : महापालिका अधिकाऱ्यांकडून घरकुल प्रकल्पातील सदनिकांची तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri Chinchwad Municipal Corporation

पिंपरी : महापालिका अधिकाऱ्यांकडून घरकुल प्रकल्पातील सदनिकांची तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने (pimpri chinchwad corporation) राबविण्यात येत असलेल्या चिखली येथील घरकुल प्रकल्पातील सदनिकांची तपासणी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले होते. त्यानुसार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाने पाहणी केली. या तपासणीत १ हजार २२३ सदनिका बंद तर फक्त २ सदनिका विक्री केल्याचे आढळून आले.

याबाबत सकाळमध्ये ‘घरकुलांची परस्पर विक्री’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेउन आयुक्तांनी या प्रकल्पातील सदनिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. आर्थिक दुर्बल घटकासाठी उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना सदर सदनिका १० वर्षा पर्यंत विकता येत नाही, तसेच भाड्याने देता येत नाही .या अटींचे उल्लंघन झाल्यास सदर लाभार्थ्याचा लाभ रद्द करून ताब्यात घेण्याची तरतूद आहे. त्यासाठी आज विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. ५ हजार ८३८ सदनिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ हजार २२३ सदनिका बंद आढळून आल्या.

हेही वाचा: बजाज फाउंडेशन करणार शहरातील भटक्या श्‍वानाचे मोफत निर्बिजीकरण

१९८ सदनिकांमध्ये भाडेकरू आढळून आले. तर दोन सदनिका विक्री झाल्याचे आजच्या प्राथमिक तपासणीत आढळून आले. सहाय्यक आयुक्त बोदडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांच्या सह १४ मंडलाधिकारी, वरिष्ठ लिपिक, लिपिक, मजूर व शिपाई असे १८९ कर्मचारी सहभागी होते. चिखली पोलिस स्टेशनचे निरीक्षक सतीश माने यांच्या उपस्थितीत व ३५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही तपासणी मोहीम राबवण्यात आली.

loading image
go to top