UPSC Result 2024 : पोलिसाच्या मुलाचे ‘यूपीएससी’ परीक्षेत यश; वाकडच्या थिटे यांच्या शुभमवर कौतुकाचा वर्षाव

Success Story : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक पोलिस फौजदार भगवान कैलास थिटे यांचे चिरंजीव शुभम भगवान थिटे यांनी ‘यूपीएससी’ परीक्षेत यश संपादन केले.
inspiring story of shubham bhagwan thite upsc exam pimpri chinchwad
inspiring story of shubham bhagwan thite upsc exam pimpri chinchwadSakal

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील सहायक पोलिस फौजदार भगवान कैलास थिटे यांचे चिरंजीव शुभम भगवान थिटे यांनी ‘यूपीएससी’ परीक्षेत यश संपादन केले. शुभम ३५९वी रँक मिळवीत उत्तीर्ण झाल्याचे समजताच कुटुंबीयांसह वाकडमधील कावेरीनगर पोलिस कॉलनीतील रहिवाशांनी शुभम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत जल्लोष केला.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे मंगळवारी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये शुभमने यांनी यश मिळविल्याचे समजल्यानंतर थिटे कुटुंबाचा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मूळचे शिरूर तालुक्यातील केंदूर येथील असलेले भगवान थिटे हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात विशेष शाखेत कार्यरत आहेत.

१९९३ पासून ते कावेरीनगर पोलिस कॉलनीत पत्नी, एक मुलगा व मुलगी यांच्यासह वास्तव्यास आहेत. पत्नी वनिता या गृहिणी आहेत तर त्यांची धाकटी कन्या स्नेहल यांनी कॉम्पुटर इंजिनिअरिंग केले असून, त्या इन्फोसिस कंपनीत कार्यरत आहेत.

तर शुभम हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. शुभम यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडगावातील माटे हायस्कूल येथे झाले. अकरावी- बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून पुण्यातील मॉडर्न हायस्कूल येथे झाल्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी येथून केले.

पदवी घेतली असली तरी त्यांचा पूर्ण फोकस सुरुवातीपासूनच यूपीएससी करण्याकडे होता. दरम्यान, पदवी घेतल्यानंतर शुभम यांना जर्मनीत नोकरीची संधीही आली होती. मात्र, ती नोकरी नाकारून यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला.

२०१९ पासून चार वेळा परीक्षा दिली. मात्र, यश मिळाले नाही. तिसऱ्या प्रयत्नात दोन गुणांवरून संधी हुकली. मात्र, शुभम यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर चौथ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली.

मंगळवारी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी आनंद साजरा केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करीत मित्रांनीही गुलाल उधळून शुभम यांचे अभिनंदन केले. कावेरीनगर पोलिस कॉलनीमध्येही जल्लोष करीत शुभम यांचे औक्षण करण्यात आले.

मुलाने माझे, कुटुंबाचे नाव मोठे केले. त्याला ज्यामध्ये आवड होती, त्यामध्ये यश संपादन केले. याचा आनंद वाटतो. त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याच्या कष्टाचे चीज झाले.

- भगवान थिटे, शुभम यांचे वडील

खूप मेहनत घेतली आहे. या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी मिळाली. याचा आनंद वाटतो. जो संयम राखला त्याचे चीज झाले आहे. प्रयत्न करीत राहिले तर यश हमखास मिळते. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असली तरी पूर्ण फोकस ‘यूपीएसीसी’कडेच होता.

- शुभम भगवान थिटे, यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेला विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com