esakal | पिंपरी-चिंचवडमधील घरकुलमध्ये होणार आयसोलेशन वॉर्ड; स्थानिकांचा मात्र विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमधील घरकुलमध्ये होणार आयसोलेशन वॉर्ड; स्थानिकांचा मात्र विरोध

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसोलेशन वॉर्डची गरज भासणार आहे.

पिंपरी-चिंचवडमधील घरकुलमध्ये होणार आयसोलेशन वॉर्ड; स्थानिकांचा मात्र विरोध

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आयसोलेशन वॉर्डची गरज भासणार आहे. या पार्श्‍वभूमीवर चिखली घरकुल प्रकल्पातील रिकाम्या चार इमारतींमध्ये आयसोलेशन वॉर्ड करण्यास महापालिका स्थायी समितीने परवानगी दिली आहे. त्यानुसार काम सुरू झाले असून, एका इमारतीत 42 सदनिका याप्रमाणे चार इमारतींच्या 168 सदनिका उपलब्ध होणार आहेत. एका सदनिकेत हॉल व बेडरूम मिळून दोन बेड या प्रमाणे 336 बेडची व्यवस्था घरकुलमध्ये होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

चिखली प्राधिकरण सेक्‍टर 17 व 19 मध्ये महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविली आहे. सध्या डी पाच, डी सहा, डी सात व डी आठ या चार इमारती बांधून तयार आहेत. त्यांची विद्युत विषयक कामे बाकी आहेत. शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अधिकचे आयसोलेशन वॉर्ड उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर घरकूलमधील डी पाच ते आठ या इमारतींमध्ये विद्युत विषयक कामे पूर्ण करून त्या राहण्यायोग्य कराव्यात व त्या ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड सुरू करावा, यास महापालिका स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरकूलमधील उपलब्ध इमारतीत आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात डी पाच व डी सहा या दोन इमारती 27 जूनपर्यंत राहण्यायोग्य कराव्यात; उर्वरित डी सात व डी आठ या दोन इमारती पाच जुलैपर्यंत राहण्यायोग्य कराव्यात, असा आदेशही स्थायी समितीने दिला आहे. त्यानुसार या इमारतींमध्ये दिवे, पंखे बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक इमारतीच्या सदनिकेत हॉल, बेडरूम, किचन, टॉयलेट, बाथरूम व बाल्कनी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरकूलच्या इमारती सात मजली आहेत. तळमजला पार्किंगसाठी आहे. प्रत्येक मजल्यावर सहा सदनिका या प्रमाणे एका इमारतीत 42 सदनिका आहे. प्रत्येक इमारतील लिफ्टची सुविधा आहे. मात्र, दुसरा, चौथा व सहावा या मजल्यांवरच लिफ्टने जाता येते. पहिला, तिसरा, पाचवा व सातव्या मजल्यावर जाण्यासाठी नजिकच्या मजल्यापर्यंत लिफ्ट जावून पायऱ्यांचा उपयोग करावा लागतो. 

हेही वाचा- मुंबईच्या डबेवाल्यांवर आलीय ही वाईट वेळ, उपासमारीमुळं करावं लागतंय हे काम

एका इमारतीत 290 बल्ब याप्रमाणे चार इमारती मिळून एक हजार 160 बल्ब बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक इमारतीच्या तळमजल्यावरील पॅसेजमध्ये प्रत्येकी दहा व प्रत्येक मजल्यावर तीन बल्ब बसविण्यात येणार आहेत. तसेच, प्रत्येक सदनिकेचा हॉल व बेडरूममध्ये एक पंखा बसविण्यात येणार आहे. तसेच, गरम पाण्यासाठी प्रति सदनिका एक या प्रमाणे 168 गिझर बसविण्यात येणार आहेत. 

स्थानिकांचा विरोध 

क्वारंटाइन व्यक्तींसाठी घरकुल परिसरातील रिकाम्या इमारती वापरण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. या पूर्वीही येथील नागरिकांनी विरोध केला होता. मात्र, सदनिकांचे कामे अपूर्ण होती. आता अपूर्ण कामे पूर्ण करून सदनिका राहण्यायोग्य करण्याचा आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिलेला आहे. तसेच, घरकुलमध्ये सुरवातीस रुग्ण आढळले होते. गेल्या आठ दिवसांतही येथे रुग्ण आढळलेले आहेत. 

loading image