esakal | सावधान! आयटी कंपन्या दाखवतायेत नोकऱ्यांचं आमिष 
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! आयटी कंपन्या दाखवतायेत नोकऱ्यांचं आमिष 
  • आयटीयन्सना नवीन पदांसह मोठ्या पॅकेजचे गाजर

सावधान! आयटी कंपन्या दाखवतायेत नोकऱ्यांचं आमिष 

sakal_logo
By
सुवर्णा नवले

पिंपरी : कोरोनातही मी दिल्ली सोडून नोकरीसाठी पुण्यात आलो. मला हिंजवडी सिनेक्रॉन आयटी कंपनीची ऑफर मिळाली. 21 लाखांचं पॅकेज दिलं. आधीच्या कंपनीत 16 लाखांचं पॅकेज होतं. त्यामुळं नोकरी सोडण्याचा निर्णय त्वरित घेतला. मी मेलवरून ऑफर स्वीकारली. कोरोनामुळं फ्लाइट वेळेत मिळाली नाही. थोडा उशीर झाला, तर कंपनीने दुसऱ्यालाच ऑफर दिली. याविषयी काही कळवलंही नाही. आधीचा जॉबही मी सोडला होता. 

कंपनीच्या मॅनेजरशी मी वारंवार संपर्क केला. त्यांनी मला टाळलं. हा सर्व प्रसंग लिंक्‍ड इनवर लिहिला. एक लाख जणांनी माझी पोस्ट पाहून सहानुभूती दर्शविली. कंपनीचा त्यानंतर कॉल आला. मात्र, अद्यापही त्यांनी दखल घेतली नाही. बड्या कंपन्यांनी आयटीयन्सला गाजर दाखवू नये. यावर वचक असायला हवा. ही करुण कहानी सांगतोय आयटीयन्स लीड बिझनेस ऍनालिस्ट अभिनव राय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंजवडी, तळवडे, खराडी, मगरपट्टा या बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या गेल्या चार महिन्यांपासून नोकरीची जाहिरातबाजी करताहेत. हे केवळ एकट्या अभिनव सोबत झालेलं नसून अनेक आयटीयन्स सध्या या परिस्थितीतून जात आहेत. सध्या 22 हजारांहून अधिक आयटीयन्स नोकरी गमावल्यानं सैरभैर झाले आहेत. त्यात कंपन्या ऑफर देऊन आयटीयन्ससोबत डबल गेम खेळत आहेत. नोकरीचं गाजर दाखवून नवीन विविध पदांवर भरती करण्याचं आमिष कंपन्यांकडून दाखवलं जातंय. मात्र, आयटी कंपन्या केवळ भरतीची प्रक्रिया राबवीत आहेत. कोणतीही भरती करत नसून मुलाखतीसाठी बोलावून विनाकारण त्रास देत असल्याचं आयटीयन्स सांगताहेत. 

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

दिल्लीत गुडगावमध्ये काम करणारा अभय सांगताहेत, "5.6 लाखांचं पॅकेज होतं. सिनिअर एक्‍झिक्‍युटिव्ह म्हणून पद होतं. अचानक कंपनीने पगार कपात केली. नंतर एप्रिलपासून पगारच दिला नाही. त्यानंतर घरीच बसवलं. आता पुण्यातील कंपन्यांमध्ये नोकरीसाठी फिरतोय. सर्व कंपन्यांमध्ये बायोडेटा पाठवलाय. काहींनी मुलाखतीला बोलावलं. ऑफरही सांगितली. पण अजूनही कामावर बोलावलं नाही.'' 

पिंपळे सौदागरमधील पार्थ सारथी मंडायम सांगताहेत, "मी एका कंपनीत टेक्‍निकल डायरेक्‍टर होतो. 15 लाखांचं पॅकेज होतं. कंपनी एका रात्रीतच बंद केली. आम्हाला माहितीही झालं नाही. त्यानंतर आता दुसऱ्या कंपन्यांमध्ये विचारणा करतोय. आयटीमधला 30 वर्षांचा अनुभव आहे. कंपन्या सांगतात. बजेट नाही. काम मिळणार नाही. प्रोजेक्‍ट बंद केला आहे. मुलाखतीला मात्र बोलावतात.'' 
 
हा प्रकार सुरूय... 
आयटी कंपन्या भरती प्रक्रियेची जाहिरातबाजी करताहेत. ते पाहून अनेक आयटीयन्स नोकरीसाठी कंपनीत जातात. दहा हजार ते बारा हजार आयटीयन्सना नोकरी मिळेल. तीन हजार जणांना काम दिलंय, अशा आशयाच्या या पोस्ट केल्या जाताहेत. 

सध्या आयटीयन्स खूप हलाखीच्या परिस्थितीतून जात आहेत. हिंजवडीसह सर्वच आयटी कंपन्या मुलाखतीनंतर ऑफरही देत आहेत. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी हा प्रकार असू शकतो. मात्र, कित्येक कंपन्यांनी परत कामावर बोलावण्याचे आश्‍वासन दिले आहे. कामगार मंत्रालयाने हा प्रकार थांबवला पाहिजे. 
- पवनजीत माने, सदस्य,माहिती तंत्रज्ञान समिती, राज्य सरकार