पिंपरी : जगताप डेअरी चौकातील वाहतूक कधी सुरळीत होणार पाहा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत असणाऱ्या जगताप डेअरी चौकामधील त्रास कमी करण्यासाठी महापालिकेकडून या ठिकाणी दोन ग्रेडसेपरेटर करण्याचे काम हाती घेतले आहे.

पिंपरी : वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत असणाऱ्या जगताप डेअरी चौकामधील त्रास कमी करण्यासाठी महापालिकेकडून या ठिकाणी दोन ग्रेडसेपरेटर करण्याचे काम हाती घेतले आहे. हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्तावर हे काम सुरू आहे. आतापर्यंत त्यापैकी एका ग्रेडसेपरेटरचे काम अंतिम टप्यात आले असले, तरी दुसऱ्याचे काम संपण्यासाठी दहा महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीमध्ये सुरळीतपणा येण्यासाठी वाहनचालकांना आणखी काही वेटिंग करावे लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय होती समस्या? 

पूर्वीपासून जगताप डेअरी चौकामध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असली, तरी त्याठिकाणी अपघाताचे प्रमाण खूप होते. रात्रीच्या वेळेत या परिसरात असे प्रकार व्हायचे. याखेरीज कायम होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बऱ्याचदा हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनांना त्याठिकाणी अडकून पडावे लागायचे. प्रामुख्याने सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत हा त्रास मोठ्या प्रमाणात व्हायचा. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याठिकाणी हिंजवडी, वाकडकडे ये-जा करण्यासाठी दोन ग्रेडसेपरेटर करण्याचे नियोजन केले. त्यापैकी एका ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर हे काम पूर्ण झाल्यास तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. दुसऱ्या ग्रेडसेपरेटरचे काम तूर्तात बंद असून, पावसाळा संपल्यानंतरच त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. हे संपूर्ण काम मार्गी लागण्यासाठी आठ ते दहा महिने वाट पाहावी लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नागरिक म्हणतात... 

जगताप डेअरी चौकामधील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी ग्रेडसेपरेटरची मदत होणार असली, तरी महापालिका प्रशासनाने हे काम वेगळे पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे. बऱ्याचदा अशा प्रकल्पांचे काम रेंगाळते, त्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना मिळण्यास उशीर होतो, असे मत दिनेश मराठे यांनी व्यक्‍त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jagtap dairy chowk traffic issue pimpri chinchwad news