esakal | भंगार मालाची नोंद ठेवा, अन्यथा कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

भंगार मालाची नोंद ठेवा, अन्यथा कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांचा इशारा

भंगाराच्या दुकानांमधून चोरीचा माल खरेदी व विकला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे.

भंगार मालाची नोंद ठेवा, अन्यथा कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांचा इशारा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : भंगाराच्या दुकानांमधून चोरीचा माल खरेदी व विकला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. त्यामुळे यापुढे भंगार दुकानदारांना त्यांच्याकडे येणाऱ्या मालाची नोंद ठेवावी लागणार, अन्यथा अशा दुकानदारांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, या भागात कंपन्यांमधील साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासह वाहनचोरीचे प्रकारही वाढले आहेत. चोरटे या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी भंगारात विकतात. यामध्ये वाहनांच्या सुट्या भागांचाही समावेश असतो. चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार दुकानदारांवर आता पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यासाठी पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार दुकानात विक्रीसाठी येणारा माल घेताना त्या मालाचा फोटो काढणे अत्यावश्‍यक आहे. तसेच, तो माल ज्याच्याकडून खरेदी केला त्याचे नाव, मोबाईल क्रमांक याची नोंद दुकानदाराने ठेवणे बंधनकारक आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी कोणत्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पोलिसांकडून भंगार दुकानांची तपासणी केली जाणार असून, या तपासणीत रजिस्टरमध्ये नोंद नसलेला माल आढळून आल्यास तो माल चोरीचा असल्याचे समजून तो माल जप्त केला जाईल, तसेच दुकानदारांवर गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.