Wakad Crime : साडे आठ वर्षाच्या बालकाचे अपहरण! अनैसर्गिक कृत्य करून खून; आरोपीस अटक

साडेआठ वर्षांच्या अपहृत निष्पाप बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला वाकड पोलीसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या.
wakad crime
wakad crimesakal

- बेलाजी पात्रे

वाकड - येथील पिंक सिटी सोसायटी समोरील घरासमोर खेळणाऱ्या सलेमान राधेश्याम बरडे ह्या साडेआठ वर्षांच्या अपहृत निष्पाप बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमला वाकड पोलीसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकून त्याच्यावर आपहरणं, पॉकसो ऍक्ट व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस उप आयुक्त, बापु बांगर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पवन जागेश्वरप्रसाद पांडे, (वय-२८ वर्षे, रा. गाव नागर, थाना माणिकपुर, जि. चित्रकुट, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. मयत बालकाचे वडील राधेश्याम रायसिंग बरडे, (वय-३३ वर्षे, रा. रोहित कलाटे चाळ, पिंकसिटी सोसायटी समोर, वाकड) यांनी त्याचे अपहरण झाल्याची तक्रार वाकड पोलिसांत दिली होती. शनिवारी (ता. २४) सायंकाळी सलेमानचे आपहरण झाले होते तर रविवारी (ता. २५) दुपारी बावधन येथील टेकडीवर सलेमानचा मृतदेह आढळला होता.

हा गुन्हा अंत्यत गंभीर स्वरुपाचा असल्याने वाकडचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाच्या दोन टिम तयार करुन अपहत मुलाचा शोध सुरु केला. गुन्हा घडल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता अपहृत मुलास एक पांडे घेऊन जात असल्याचे दिसल्याने त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याला खाक्या दाखविताच त्याने अपहरण करून मुलासोबत अनैसर्गिक संभोग करुन त्याचा खुन करुन मृतदेह बावधन येथे टाकल्याचे सांगितले.

मयत सलेमान राहत असलेल्या चाळी शेजारीच असलेल्या गुऱ्हाळात आरोपी कामाला होता. इथेच मयत बालक खेळत असल्याने दोघांची ओळख होती. यातून आरोपीने एक दोनदा त्याला उसाचा रस मोफत देऊन ओळख वाढवली, मैत्री केली अन माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले.

घटनास्थळावरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविला आहे. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणाही आढळल्या आहेत. मात्र, पवनने खून कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

बरडे बांधकाम मजूर आहेत. त्यांना चार मुले असून, सलेमान सर्वात लहान होता. तो शनिवारी (ता. २४) सायंकाळी नेहमीप्रमाणे घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. सायंकाळी सहाच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर रात्री आठच्या सुमारास तो नेहमी घरी यायचा.

मात्र, शनिवारी रात्री उशिरापर्यंत सलेमान घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी परिसरात त्याचा शोध घेतला. तो कुठेही आढळला नाही. रविवारी (ता. २५) सकाळी राधेश्याम यांनी सलेमान बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com