Kishor Aware Murder Case : किशोर आवारे हत्येप्रकरणी चार आरोपी जेरबंद

एका आरोपीचा पथकामार्फत शोध चालू आहे
Kishor Aware
Kishor AwareESAKAL

पिंपरी : किशोर आवारे हत्या प्रकरणात चार मुख्य आरोपी आणि एक मदत करणारा सहआरोपी असे एकूण पाच आरोपी निष्पन्न झाले आहेत.पैकी चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.घटनेनंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसणारा एक जण पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतला.

तर तळेगाव एमआयडीसी, नवलाख उंबरे परिसरातून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने तीन जणांना शनिवारी (ता.१३) पहाटे ताब्यात घेतले आहे. एका आरोपीचा पथकामार्फत शोध चालू आहे.शाम निगडकर,संदीप मोरे,रघु धोत्रे आणि आदेश धोत्रे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींची संख्या आणखी वाढू शकते असे,दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com