

Deputy CM Shinde says the ‘Ladki Bahin’ scheme will continue.
sakal
चाकण : चाकण ता. खेड येथे शिवसेनेचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा होता. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडवट टीकेचे बाण सोडले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,"शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे पाप झालं त्यावेळी एकनाथ शिंदेंनी उठाव केला. पन्नास आमदार एकनाथ शिंदे सोबत राहिले ही मोठी गोष्ट आहे. चाकण येथील वाहतूक कोंडी सोडली जाणार आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाला मान्यता दिलेली आहे. त्या मार्गाच्या कामाचे टेंडर सुरू आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चाचे काम होणार आहे. माझी भूमिका ऑन द स्पॉट डिसिजन अशी आहे. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून मळमळ ,जळजळ आहे मी दिल्लीला गेलो तरी काहींना मळमळते."