esakal | कोयत्याचा गुन्हेगारांकडून पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वापर
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

कोयत्याचा गुन्हेगारांकडून पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वापर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : खून, प्राणघातक हल्ला, मारहाण, वाहनांची तोडफोड असो की, दहशत माजविणे, यासाठी गुन्हेगारांकडून कोयत्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यामुळे विविध घटनांमध्ये कोयत्यानेच घात होत असल्याचे दिसून येत आहे. (Large scale use Sickle criminals Pimpri-Chinchwad city)

कोयता हे हत्यार सहज उपलब्ध होत असल्याने गुन्ह्यांमध्येही कोयत्याचा वापर वाढला आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिस (police) आयुक्तालयाच्या हद्दीत घडणाऱ्या बहुतांश घटनांमध्ये गुन्हेगारांनी कोयत्याचाच वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. कमी किमतीत व सहजरित्या हे हत्यार उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारांकडे हमखास कोयता आढळतो. यासह दरोडा, चोरीतील आदी गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडेही कोयता आढळतो.

हेही वाचा: 'माणूस'कार श्री. ग. माजगावकर पुरस्कार श्रीकांत बहुलकर यांना जाहीर

विविध अवजारे बनविणाऱ्या ठिकाणी अथवा एखाद्या वर्कशॉपमधील मशिनवर लोखंडापासून कोयता बनविला जातो. त्याची कुठेही नोंद नसते. पोलिसांनी कोयता नेमका येतो कुठून, याचा शोध घेण्यासह कोयता बनविणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे.

हेही वाचा: पुण्याच्या मैथिलीची हार्वर्डमध्ये निवड

मागील महिनाभरात घडलेल्या घटना

  • १४ जुलै : कोयता हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट; एकजण ताब्यात.

  • ११ जुलै : चिखली येथे एकाचा भरदिवसा कोयत्याने वार करून खून झाला.

  • ११ जुलै : पिंपरी येथे कोयता बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा.

  • ८ जुलै : पिंपरीत तरुणावर कोयत्याने हल्ला.

  • ३ जुलै : पिंपळे निलखला तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

  • २४ जून : बोपखलेमध्ये तरुणावर कोयत्याने वार करून वाहनांची तोडफोड.

  • २४ जून : निगडित कोयता बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

  • २२ जून : चिंचवडमध्ये टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने हल्ला.

loading image