विधान परिषद मतदानासाठी पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधरांसाठी 43, शिक्षकांसाठी 9 मतदान केंद्र

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. 1) मतदान होणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच अशी मतदानाची वेळ आहे. या निवडणुकीसाठी शहराची चार भागात विभागणी केलेली आहे. पदवीधरसाठी 43 आणि शिक्षक मतदारसंघासाठी शहरात नऊ मतदान केंद्र असून निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे.

पिंपरी - विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. 1) मतदान होणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच अशी मतदानाची वेळ आहे. या निवडणुकीसाठी शहराची चार भागात विभागणी केलेली आहे. पदवीधरसाठी 43 आणि शिक्षक मतदारसंघासाठी शहरात नऊ मतदान केंद्र असून निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारामुळे गेल्या पंधरा दिवसांत शहरातील वातावरण ढवळून निघाले. पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात होतो. बॅलेट पेपरद्वारे (मतपत्रिका) मतदान प्रक्रिया होणार आहे. पदवीधरसाठी 63 आणि शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार असून अनुक्रमे 31 हजार 991 आणि पाच हजार 925 मतदार आहेत. मतदारांनी पसंती क्रमांक दर्शवून मतदान करायचे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दोन जणांचा मृत्यू; तर 172 नवीन रुग्ण 

सोशक मीडियाद्वारे संपर्क 
गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचार सुरू होता. या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारानिमित्त शहरात हजेरी लावल्याने शहर पातळीवर चुरस निर्माण झाली. रविवारी सायंकाळी प्रचार थंडावला. मात्र, उमेदवार व त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एसएमएस, फेसबुक, इंस्टाग्रॉम, व्हॉटस्‌ऍप, ई-मेलद्वारे मतदारांशी संपर्क साधून मतदान करण्याचे आवाहन केले. 

महापालिका कर्मचारी नियुक्त 
विधान परिषद निवडणूक प्रक्रियेसाठी महापालिकेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील तीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यातील दीडशे कर्मचारी मतदानाच्या दिवशी मंगळवारी (ता. 1) आणि दीडशे कर्मचारी मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (ता. 3) नियुक्त केले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे महापालिका प्रशासनाने तीनशे कर्मचाऱ्यांची यादी पाठविली होती. त्यानुसार कर्मचारी नियुक्त केले असल्याचे प्रशासन अधिकारी मनोज लोणकर यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Legislative Council Election voting centers in pimpri chinchwad city