
Chartholi News
Sakal
पिंपरी : चऱ्होली बुद्रुक परिसरातील राही कस्तुरी अपार्टमेंटच्या मागील बाजूच्या शेतात बुधवारी (ता. २५) बिबट्याचे दोन बछड्यांचा मुक्त वावर दिसून आला. बिबट्या दिसल्याने स्थानिकांमध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक रात्रीच्यावेळेस घराबाहेर पडायला घाबरत आहेत. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.