

"Leopard spotted roaming near Exurbia Housing Society, Nerre."
Sakal
हिंजवडी : सोसायटीच्या कुंपणाजवळील डोंगरालगत फिरणारा बिबट्या एका महिलेने मोबाईलमध्ये कैद केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री-अपरात्री शिफ्ट आटोपून घरी परतणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. एक्झर्बिया सोसायटी डोंगराला लागून असल्याने यापूर्वीही वारंवार बिबट्यासह वन्य प्राण्यांचा वावर आढळला आहे.