esakal | पिंपरी-चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांचे 'ते' पत्र होतेय व्हायरल 
sakal

बोलून बातमी शोधा

The letter from former Pimpri-Chinchwad police commissioner Sandeep Bishnoi has gone viral

राज्यातील अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बुधवारी (ता. 2) रात्री बदल्या झाल्या. त्यामध्ये कृष्णा प्रकाश यांची पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तर 20 सप्टेंबर 2019 ला पिंपरी-चिंचवड आयुक्तपदी रुजू झालेले बिष्णोई यांची वर्षपूर्ती होण्यापूर्वीच बदली करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांचे 'ते' पत्र होतेय व्हायरल 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे नवे पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी शनिवारी (ता. 5) मावळते आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. अशातच एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाल्याने मावळते आयुक्त बिष्णोई यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट) कडे धाव घेतल्याबाबचे पत्र शुक्रवारी रात्रीपासून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र, याबाबत बिष्णोई यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे बिष्णोई नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बुधवारी (ता. 2) रात्री बदल्या झाल्या. त्यामध्ये कृष्णा प्रकाश यांची पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तर 20 सप्टेंबर 2019 ला पिंपरी-चिंचवड आयुक्तपदी रुजू झालेले बिष्णोई यांची वर्षपूर्ती होण्यापूर्वीच बदली करण्यात आली. तसेच त्यांच्या नव्या पदस्थापणेचे आदेशही अद्याप काढण्यात आलेले नाहीत. त्यांच्या मुदतपूर्व बदलीची पोलिस दलात जोरदार चर्चा झाली. याबाबत ते कॅट कडे दाद मागतील, असेही बोलले जात होते. दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासून सोशल मिडियावर एक पत्र व्हायरल होत असून त्यामध्ये नियमांना छेद देत वर्षपूर्ती होण्यापूर्वीच झालेल्या बदलीबाबत बिष्णोई यांनी कॅटकडे दाद मागितल्याचे नमूद आहे. यामध्ये त्यांनी राज्याच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदी नव्याने आदेश दिलेले कृष्णा प्रकाश, केंद्र शासनाचे गृह मंत्रालयाचे सचिवालय यांच्याबाबत कॅटकडे तक्रार केली आहे. मात्र, व्हायरल झालेल्या या बारा पाणी अर्जावर बिष्णोई यांची कुठेही स्वाक्षरी नाही. 

दरम्यान, याबाबत बिष्णोई यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही. अशातच शनिवारी (ता.5) सकाळी कृष्णा प्रकाश यांनी बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यामुळे या बदलीविरोधात बिष्णोई कॅट कडे धाव घेणार का, हे अद्यापतरी गुलदस्त्यात आहे. मात्र, शुक्रवारी रात्रीपासून व्हायरल होत असलेल्या बिष्णोईंच्या त्या पत्राची जोरदार चर्चा आहे. 

पिंपरी चिंचवडच्या गुन्हेगारांनो सावधान, आयर्नमॅन आलाय...​

अवघ्या अकरा महिन्यातच बदली 
पिंपरी चिंचवडचे पहिले आयुक्त आर.के. पदमनाभन यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली झाल्यानंतर मुंबई येथे वैधमापन शास्त्र नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले बिष्णोई यांची 20 सप्टेंबर 2019 ला पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी विधानसभा निवडणूक, अयोध्या प्रकरणाचा निकाल अशा महत्वाच्या वेळी शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राखली. अपुरे मनुष्यबळ असतानाही शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. 

कोरोना महामारीच्या संकटात पोलिसांनी रस्त्यावर उतरून अहोरात्र काम केले. या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना धीर देत सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली. अशातच अवघ्या अकरा महिन्यातच त्यांची बदली करण्यात आली. 

loading image