
बाळासह सावरले कुटुंब; स्वतःसह कुटुंबीयांची कोरोनावर मात
पिंपरी - कोरोना संसर्गाचे (Corona Virus) पहिले रुग्ण (Patient) शहरात आढळले तेव्हा गरोदर (Pregnant) होते. बाळाला (Child) धोका (Danger) तर, होणार नाही ना, अशी मनात भीती होती. पण, तशाही अवस्थेत काम केले. कालांतराने मुलगी झाली. बाळांतपणाची सुटी संपून कामावर हजर झाले. आता मुलगीही दहा महिन्यांची झाली होती. पण, एके दिवशी ताप आला. सर्दी झाली. तपासणी (Checking) केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह (Positive) आला. घरात दहा महिन्यांची व एक पाच वर्षांची मुलगी. ६३ वर्षांच्या सासूबाई व पती होते. त्यांनाही संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे अधिकच घाबरले. त्यात माझा रक्तदाबही वाढला होता. पण, आपण चांगले झालो तर, कुटुंब सांभाळू शकू, असा विचार करून उपचार घेतले. आता त्यातून सर्व कुटुंबच बरे झाले आहे. मी पुन्हा रुग्णसेवेत रुजू झाले आहे, हे शब्द आहेत, कासारवाडीतील पब्लिक हेल्थ नर्स (पीएचएन) यशस्विता बानखेले (Yashaswita Bankhele) यांचे. (Laife Saving family with baby Corona Yashaswita Bankhele)
संशयितांची तपासणी करणे, ते पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याही तपासणी करणे, अशा स्वरूपाची कामे वायसीएम रुग्णालयाच्या माध्यमातून बाणखेले करीत आहेत. गेल्या २७ मार्च रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तपासणी केल्या. कुटुंबातील सर्वांनाच संसर्ग झाला होता. त्या म्हणाल्या, ‘‘वयोमानानुसार, सासूबाईंना रुग्णालयात दाखल केले. पती व मुलींना काही लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यांच्यासह मी होमआयसोलेशनचा निर्णय घेतला. पण, सातव्या दिवशी माझा त्रास वाढल्याने सिटीस्कॅन केले. संसर्ग वाढला होता. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. रक्तदाब वाढल्याने हॉस्पिटलमधील कालावधी वाढला. मुलींची आठवण यायची. पण, नाइलाज होता. आपल्यामुळेच त्यांना त्रास झाला, अशी खंत मनाला वाटत होती. पण, विचार केला, मी चांगले राहिले तप, कुटुंब सांभाळू शकेन. आणि बरी होऊन घरी आले. आता पुन्हा रुग्णसेवेत रुजू झाले आहे.’’
हेही वाचा: लोणावळ्यात १५ दिवसात ५० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करणार
कोरोनावर मात करण्यासाठी औषधोपचाराबरोबरच सकारात्मक विचार गरजेचा आहे. नागरिकांनी भीती न बाळगता सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. त्वरित तपासणी, त्वरित उपचार केल्यास कोरोनावर आपण सहज मात करू शकू.
- यशस्विता बाणखेले, पीएचएन, कासारवाडी
वायसीएमच्या टाइम ऑफिसची जबाबदारी माझ्याकडे आहे. सप्टेंबरमध्ये त्रास झाल्याने तपासणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पती व दोन्ही मुलींनाही संसर्ग झाल्याचे आढळले. पण त्यांना लक्षणे नव्हती. मला ऑक्सिजनची गरज पडली. दोन वेळा प्लाझ्मा द्यावा लागला. रेमडेसिव्हिरचे सहा इंजेक्शन लागले. बरे झाल्यानंतर कामावर पुन्हा रुजू झाले आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल आणि सकारात्मक विचार ठेवल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो, हे लक्षात ठेवावे.
- संगीता पाटील, वायसीएम, पिंपरी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने रुग्णालयाने रुग्णांना सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मनात भीती वाटू लागली की, आता माझे काय होणार? माझी मुले लहान असल्याने, घरच्यांनी सुरवातीला विरोध केला. पण नंतर तो मावळला. एके दिवशी मुलीला ताप आला. त्यामुळे मीही टेस्ट केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रुग्णालयात दाखल झाले. सगळे उपचार झाले. त्यातून बरे झाले. त्यावेळी कळाले रुग्णांची काय अवस्था असते. त्यामुळे जोमाने कामाला सुरवात केली आणि पुन्हा रुग्णसेवा सुरू झाली.
- योगिता गुरव, लोकमान्य हॉस्पिटल, निगडी
मी उत्साहाने कोविड रुग्णांची जबाबदारी घेतली खरी; पण कोविडने माझ्याच कुटुंबात सर्वांना बाधित केले. पती, मुलगी व सासूबाई पॉझिटिव्ह आले. सर्व कुटुंब ॲडमिट झाल्याने टेन्शन वाढले. पतीला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. त्यांच्यासह सासूबाईंची प्रकृती गंभीर होती. काहीच सुधारत नव्हते. सर्वजण बरे होऊन घरी आलो. मी मनाशी खूणगाठ बांधली की एकाही कुटुंबाला असा धक्का बसू द्यायचा नाही. आता पुन्हा रुग्णसेवा सुरू आहे. तसेच लसीकरणातही सक्रिय आहे.
- शोभा धनावडे, लोकमान्य हॉस्पिटल, निगडी
Web Title: Life Saving Family With Baby Corona Yashaswita
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..